Join us

म्युच्युअल फंडांची ८,७०० कोटींची शेअर गुंतवणूक

By admin | Updated: October 4, 2015 22:39 IST

शेअर बाजारात मंदी असतानाही म्युच्युअल फंडस्च्या व्यवस्थापकांनी सप्टेंबर महिन्यात खरेदी सुरूच ठेवली व त्याद्वारे ८,७०० कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकत घेतले.

नवी दिल्ली : शेअर बाजारात मंदी असतानाही म्युच्युअल फंडस्च्या व्यवस्थापकांनी सप्टेंबर महिन्यात खरेदी सुरूच ठेवली व त्याद्वारे ८,७०० कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकत घेतले. म्युच्युअल फंडांनी शेअर्समध्ये गुंतवणूक केलेला हा सलग १७ वा महिना होता.म्युच्युअल फंडस् व्यवस्थापकांनी गेल्या महिन्यात ८,६७१ कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकत घेतले. आॅगस्ट महिन्यात म्युच्युअल फंडस् व्यवस्थापकांनी १०,५३३ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली. याउलट विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात ६,४७५ कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकले. आॅगस्ट महिन्यात त्यांनी १७,४३४ कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकले होते.चीनच्या शेअर बाजारात वेगाने घसरण झाल्यामुळे निर्माण झालेल्या मंदीचा लाभ घेण्यासाठी म्युच्युअल फंडस् व्यवस्थापकांनी जबरदस्त गुंतवणूक केली.