Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘जेम्स-ज्वेलरी कौन्सिलमध्ये ८ जागा हव्यात’

By admin | Updated: June 17, 2015 03:33 IST

देशांतील सराफा व्यापाऱ्यांची महत्त्वपूर्ण संघटना असलेल्या जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या (जीजेईपीसी) आगामी

मुंबई : देशांतील सराफा व्यापाऱ्यांची महत्त्वपूर्ण संघटना असलेल्या जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या (जीजेईपीसी) आगामी निवडणुकीत सोने व्यापाऱ्यांना किमान आठ जागा देण्याची मागणी इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेएचे) केली आहे. आयबीजेएचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी सांगितले की, जीजेईपीसीने आगामी निवडणुकीसाठी पाच पॅनल स्थापन केले असून, प्रत्येक पॅनलला निवडक जागा दिल्या आहेत. यामध्ये हिरे व्यापाऱ्यांसाठी आठ, प्रेशियस मेटल उद्योगांसाठी तीन, मोती, सिन्थेटिक स्टोन्ससाठी प्रत्येका दोन, कॉश्च्युम दागिने पॅनल आणि परदेशी पर्यटक विक्री पॅनलसाठी आणि प्रादेशिक अध्यक्षांसाठी पाच जागा दिल्या जाणार आहेत. देशातील सोन्याचा व्यापार आणि प्रभाव लक्षात घेता सोने उद्योगाला फारसे स्थान देण्यात आले नाही. केवळ तीन जागा देण्यात आल्या आहेत. २०१३-१४ या आर्थिक वर्षात ८०-२० टक्क्यांच्या नियमामुळे झालेले नुकसान वगळता अन्य सर्व वर्षी सोन्याच्या निर्यातीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सोने उद्योगाचे महत्व लक्षात घेता किमान आठ जागा देण्यात याव्यात.