Join us
Daily Top 2Weekly Top 5

६०० संशयित खाती चौकशीच्या फे-यात

By admin | Updated: August 15, 2014 00:06 IST

भारतीयांनी विदेशात जमा केलेल्या संशयास्पद ब्लॅक मनीच्या (काळा पैसा) आणखी एका प्रकरणात तपास संस्था ६०० नवीन खात्यांची चौकशी करीत आहे

नांदेड : चांगल्या भागात सदनिका उपलब्ध करुन देतो म्हणून तब्बल ११ लाख रुपये उकळणाऱ्या एलआयसी एजंटाविरोधात विमानतळ ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे़ यातील आरोपी बालाजी शामराव निमढगे (रा़ पळसा, ता़ हदगाव) हा नांदेड येथे एलआयसी एजंट म्हणून काम करतो़ शहरात चांगल्या भागात सदनिका बांधून देतो म्हणून त्याने चंद्रकला पद्माकर बामणे यांचा विश्वास संपादन केला़ काही कामासाठी पैसे हवे आहेत म्हणून १० लाख ८० हजार रुपये बामणे यांच्याकडून घेतले़ मात्र पैसे परत दिले नाहीत़ पैशाची मागणी केली असता निमढगे याने ३ लाख ७० हजार रुपयांचे चेक दिले़ ते न वटताच परत आले़ सदरील रक्कम जानेवारी २०११ ते जुलै २०१४ या कालावधीत दिलेली असून ती परत न करता आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार बामणे यांनी केली़ यावरुन विमानतळ ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून तपास पोलिस उपनिरीक्षक राठोड हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)