सिंगापूर : भरपूर पुरवठा, घटलेली मागणी आणि गोल्डमन सॅकने कमी किमतीच्या वर्तविलेल्या भाकिताच्या पार्श्वभूमीवर आशियातील बाजारपेठेत तेलाची किंमत मंगळवारी गेल्या सहा वर्षांतील नीचांकावर आली.अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या तेलाची किंमत बॅरलला सकाळी ७१ सेंटस्ने घटून ४५.३६, तर बे्रंट क्रूड तेल ७० सेंटस्ने घटून ४६.७३ अमेरिकन डॉलरवर आले. ब्रेंट क्रूड एप्रिल २००९ नंतर प्रथमच सोमवारी ५ सेंटस्ने वधारून ५० अमेरिकन डॉलरवर गेले होते. यावर्षी तेल ४० डॉलरवर पोहोचेल, असे भाकीत विश्लेषकांनी याआधीच केलेले आहे. गोल्डमन सॅकने वेस्ट टेक्सास येत्या सहा महिन्यांत ३९ अमेरिकन डॉलरवर येण्याचे भाकीत केले आहे. हेच भाकीत यापूर्वी ७५ अमेरिकन डॉलर करण्यात आले होते. तेलाच्या बाजारात अनेक महिने प्रचंड पुरवठा होणार असल्याचेही भाकीत आहे. अमूक एका आकड्याचे लक्ष्य नसले तरी तेलाच्या घसरत्या किमती या मानसिक स्थैर्य घालवणाऱ्या असल्याचे बाजारपेठेचे विश्लेषक मायकेल मॅककार्थी यांनी सीएमसी मार्केटस् सिडनीमध्ये म्हटले आहे.तेलाचा फाजील वाढलेला पुरवठा बंद होऊन किंमती स्थिर होईपर्यंत आम्हाला शेलच्या उत्पादनात आणखी घट झालेली बघणे गरजेचे आहे, असे मॅकार्थी म्हणाले. अमेरिकेतील शेल गॅस उत्पादनात झालेली वाढ जागतिक बाजारपेठेत पुरवठा वाढण्यास कारण ठरल्याचे सांगितले जाते. शिवाय तेलाच्या बाजारपेठेत लिबियाही पुन्हा परतला आहे. (वृत्तसंस्था)
कच्च्या तेलाचा ६ वर्षांचा नीचांक
By admin | Updated: January 14, 2015 00:18 IST