Join us

ऑगस्टपर्यंत येणार ५ जी; दूरसंचार राज्यमंत्री चौहान यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 07:36 IST

5G : ‘वर्ल्ड समिट ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी’ २०२२ मध्ये बुधवारी दूरसंचार राज्यमंत्री देऊ सिंह चौहान यांनी ही माहिती दिली.

नवी दिल्ली : केंद्र सरकार यावर्षी ऑगस्टपर्यंत देशात विकसित केलेली ५ जी सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. ‘वर्ल्ड समिट ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी’ २०२२ मध्ये बुधवारी दूरसंचार राज्यमंत्री देऊ सिंह चौहान यांनी ही माहिती दिली.

सरकार दूरसंचार तंत्रज्ञानाच्या विकासासाठी वित्तपुरवठा करण्यासह संशोधन आणि विकासनिधीही सुरू करीत आहे. भारताने स्वदेशी ४ जी तंत्रज्ञान विकसित केले असून, यात ४ जी कोर आणि रेडिओ एक्सेस नेटवर्कची रचना आहे. यातून ग्राहकाला कोणतीही कंपनी निवडता येते. यामुळे खर्चही कमी येतो. ५ जी सेवाही ऑगस्ट २०२२ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आयआयटी मद्रास येथे ५जी ची यशस्वी चाचणी झाल्याची घोषणा नुकतीच केली आहे.

टॅग्स :व्यवसायतंत्रज्ञान