Join us

५२७५ कर्जदारांनी थकविले तब्बल ५६,६२१ कोटी रुपये!

By admin | Updated: March 29, 2016 01:41 IST

सुमारे सात हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून फरार झालेल्या विजय मल्ल्या यांची सध्या चर्चा जोरात असली तरी त्यांच्याप्रमाणे देशातील सुमारे ५२७५ लहान-मोठ्या कर्जदारांनी देशातील

- मनोज गडनीस,  मुंबईसुमारे सात हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून फरार झालेल्या विजय मल्ल्या यांची सध्या चर्चा जोरात असली तरी त्यांच्याप्रमाणे देशातील सुमारे ५२७५ लहान-मोठ्या कर्जदारांनी देशातील विविध बँकांचे तब्बल ५६,५२१ कोटी रुपये थकविले असल्याची माहिती पुढे आली आहे. ही आकडेवारी केवळ ज्यांना बँकांनी ‘स्वेच्छेने कर्ज बुडविणारे’ लोक म्हणून घोषित केले आहे त्यांचीच आहे. ज्यांना अद्याप घोषित केलेले नाही; परंतु ज्यांनी कर्जे थकविली आहेत, अशा कर्जदारांची संख्या ७४३६ इतकी असून त्यांनी बँकांची ११५,३०१ कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे. सर्व बँका व वित्तीय संस्थांची थकीत कर्जाच्या एकत्रित आकडेवारीने चार लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केलाआहे. थकीत कर्जाचे वाढते प्रमाण लक्षात घेत बँकांनी थकीत कर्जाचा आणि ते थकविणाऱ्या कर्जदाराचा तपशील गोळा करण्याचे काम कर्जदाराची पत जोखणाऱ्या ‘सिबिल’ (क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो, इंडिया) ला दिले आहे.या तपासातून थकीत कर्जाची व कर्जदारांची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, देशातील १९ सरकारी बँकांमधून स्वेच्छेने कर्ज बुडविणाऱ्या लोकांची संख्या ही ४७३८ इतकी असून त्यांनी २६,६०० कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे, तर स्टेट बँक आॅफ इंडिया आणि त्यांच्या सहकारी बँकांमधील स्वेच्छेने कर्ज बुडविणाऱ्या कर्जदारांची संख्या ही १५४६ इतकी आहे. या लोकांनी ४७,३५० कोटी रुपयांचे कर्ज बुडविले आहे. सात हजार कोटी रुपयांचे कर्ज थकविल्यामुळे किंगफिशरच्या नावाची सध्या चर्चा होत असली तरी, सरकारी बँकांच्या थकीत कर्जाच्या क्रमवारीत किंगफिशर चौथ्या क्रमांकावर आहे.सिबिलच्या तपासणीत ५६ हजार कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची जी प्रकरणे उजेडात आली आहेत, त्यामध्ये २५ लाख रुपये आणि त्यावरील कर्जदारांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश लोकांवर कायदेशीर कारवाई यापूर्वीच सुरू झालेलीआहे. थकीत कर्जाच्या बाबतीतही महाराष्ट्र अग्रेसरथकीत कर्जाच्या आकडेवारीची राज्यनिहाय स्थिती तपासली तर कर्ज थकविणारे आणि थकीत कर्जाची रक्कम अशा दोन्ही घटकात महाराष्ट्राचा क्रमांक अव्वल असल्याचे दिसते. महाराष्ट्रातील थकीत कर्जदारांची संख्या ११३८ इतकी असून या लोकांनी तब्बल २१,६४७ कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे. त्यानंतर प. बंगालमध्ये कर्ज थकविणाऱ्या लोकांचा आकडा ७१० आहे.आंध्र प्रदेशात ५६७ लोकांनी कर्ज थकविले आहे. दिल्लीमधील थकीत कर्जाचा आकडा हा ७२९९ कोटी रुपये इतका आहे.१४ वर्षांत थकीत कर्जात नऊ पट वाढ२००२ मध्ये बँकांच्या थकीत कर्जाचा आकडा ६२९१ कोटी रुपये इतका होता. सरत्या १४ वर्षांमध्ये यात तब्बल नऊ पट वाढ होत आता हा आकडा ५६,५२१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.