Join us

पाच हजार कोटींचे कर विवाद निकाली

By admin | Updated: February 17, 2016 02:48 IST

कर विभागाने दोन वर्षात सॉफ्टवेअर आणि सल्लागार क्षेत्रातील विदेशी कंपन्यांशी निगडित पाच हजार कोटी रुपयांच्या करविवादाचा

नवी दिल्ली : कर विभागाने दोन वर्षात सॉफ्टवेअर आणि सल्लागार क्षेत्रातील विदेशी कंपन्यांशी निगडित पाच हजार कोटी रुपयांच्या करविवादाचा ‘आपसी करारा’तहत (म्युच्युअल अ‍ॅग्रिमेंट प्रोसिजर-एमएपी) निपटारा केला आहे.केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) ही माहिती दिली. अमेरिका, जपान, ब्रिटन, चीन आणि देशातील कंपन्यांसोबत असलेली करविवादाची प्रकरणे निकाली काढण्यात आल्याचे सीबीडीटीतर्फे सांगण्यात आले. १ एप्रिल २०१४ ते आजच्या तारखेपर्यंत सीबीडीटीने एमएपीतहत १८० प्रकरणांचा निपटारा केला आहे. या विवादात जवळपास पाच हजार कोटी रुपयांची रक्कम अडकली होती. ‘दुहेरी कर बचाव करारा’तहत (डबल टॅक्सेशन अ‍ॅव्हायडन्स अ‍ॅग्रिमेन्टस्) एमएपी ही करविवादाचा निपटारा करण्यासाठी एक पर्यायी व्यवस्था आहे. ही व्यवस्था अधिकारी आणि विदेशी गुंतवणूकदार यांच्यासाठी उपलब्ध आहे.