Join us
Daily Top 2Weekly Top 5

टाटा बनविणार ५ हजार बसेस

By admin | Updated: September 8, 2016 04:55 IST

देशभरातील २५ राज्ये आणि शहरांतून टाटा मोटर्सला यंदा ५ हजार बसेसची आॅर्डर मिळाली असून, याच आर्थिक वर्षांत त्या बसेस संबंधित परिवहन महामंडळांना वा शहर वाहतूक संस्थांना

मुंबई : देशभरातील २५ राज्ये आणि शहरांतून टाटा मोटर्सला यंदा ५ हजार बसेसची आॅर्डर मिळाली असून, याच आर्थिक वर्षांत त्या बसेस संबंधित परिवहन महामंडळांना वा शहर वाहतूक संस्थांना तयार करून दिल्या जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बसेसची मिळालेली आॅर्डर ८0 टक्क्याने अधिक आहे. विविध राज्ये आणि शहरांनी चार वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा फायदा टाटा मोटर्सला झाला आहे. नवीन तंत्रज्ञान, सुरक्षा यंत्रणा. बसण्यासाठी आरामदायी आसने ही टाटा मोटर्सच्या बसेसची वैशिष्ट्ये असल्याने त्या बसेस खरेदी करण्याकडेच कल दिसून येत आहे. या संदभार्तत टाटा मोटर्स कार्यकारी संचालक रवी पिशारोडी म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानामुळे आमच्या बसेसचा देखभालीचा खर्च कमी आहे आणि परिवहन महामंडळे आणि शहर वाहतूक संस्था यांना नेमकी हीच गरज आहे. यापैकी काही बसेस वातानुकुलीतही आहेत. (प्रतिनिधी)