Join us

इलेक्ट्रॉनिक्स संशोधनावर ५०० कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: March 10, 2016 03:03 IST

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाशी संबंधित संशोधनावर सरकार वार्षिक ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करते, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाशी संबंधित संशोधनावर सरकार वार्षिक ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करते, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), भारतीय विज्ञान संस्था आणि अन्य प्रमुख संस्थांतील विशेष केंद्रांत हे संशोधन केले जातआहे. खाजगी क्षेत्रानेही या केंद्रात सहभागी होऊन संशोधनासाठी गुंतवणूक करावी, अशी सरकारची इच्छा आहे, असे सचिव अरणा शर्मा यांनी सांगितले. ते नॅसकॉम कॉर्पोरेटच्या सामाजिक उत्तरदायी नेतृत्व परिषदेत बोलत होते. या विशेष केंद्रात वैद्यकीय, इलेक्ट्रॉनिक्स, नॅनो इलेक्ट्रॉनिक्स आदी क्षेत्रात संशोधन केले जात आहे.इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग व नॅसकॉम फाऊंडेशन दरम्यानच्या एका सौद्याची या परिषदेत घोषणा करण्यात आली.ई-कचऱ्याचा पर्यावरण व आरोग्यावर होणारा परिणाम, तसेच निवारण करण्यासाठी जनजागरण करण्याचे काम या फाऊंडेशनवर सोपविण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)