Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या भावात ५० रुपयांची घट

By admin | Updated: December 19, 2014 04:08 IST

मागणीअभावी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव ५० रुपयांनी घटून २७,२५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

नवी दिल्ली : मागणीअभावी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव ५० रुपयांनी घटून २७,२५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. दुसरीकडे जागतिक बाजारात सोन्याच्या भावात तेजी नोंदली गेली. तथापि, चांदीचा भाव ३६,७०० रुपये प्रतिकिलोवर कायम राहिला.व्यापाऱ्यांनी सांगितले की, आभूषण निर्माते व किरकोळ विक्रेत्यांच्या मागणीत घट झाल्याने स्थानिक बाजारात घसरणीचा कल होता. अमेरिकी फेडने आपल्या पतधोरणात कोणताही बदल न केल्याने जागतिक बाजारात तेजी दिसून आली. या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारातील घसरणीला काहीसा लगाम बसला.सिंगापुरात सोन्याचा भाव १ टक्क्याने वधारून १,२०२.०८ डॉलर प्रतिऔंस राहिला.तयार चांदीचा भाव ३६,७०० रुपयांवर कायम राहिला, तर चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव २५ रुपयांच्या अल्प वाढीसह ३६,८०० रुपयांवर स्थिरावला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ६१,००० रुपये व विक्रीकरिता ६२,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)