Join us  

मुलाच्या नावाने PPF खातं उघडा, होईल फायदाच फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 1:03 PM

पीपीएफ योजना ही कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी लाभदायी आहे. केवळ आर्थिकच नव्हे, तर या योजनेचे इतरही लहान-सहान

मुंबई - केंद्र सरकारने सुरक्षित भविष्यासाठी पब्लिक प्रोव्हीडंट फंड  (पीपीएफ) ही योजना सुरू केली आहे. ही योजना म्हणजे सर्वोत्तम बचत योजना आहे. करमुक्त सेवा आणि पैशांची बचत यासाठी ही योजना अतिशय लाभदायी आहे. या दिर्घकालीन बचत योजनेवर लाभार्थ्यांना 8 टक्के व्याजदरही मिळते. त्यामुळे ही योजना सर्वात लोकप्रिय ठरत आहे. या योजनेसोबत इतरही अनेक फायदे लाभार्थ्यांना मिळतात. 

पीपीएफ योजना ही कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी लाभदायी आहे. केवळ आर्थिकच नव्हे, तर या योजनेचे इतरही लहान-सहान फायदे लाभार्थ्यांना मिळतात.

1. पीपीएफ अकाऊंट साधारण 15 वर्षांच्या मुदतठेव योजनेसाठी असल्याने कमी वयातही हे खाते उघडल्यास अधिक फायदा होईल. जर तुमचा मुलगा 5 वर्षांचा असतानाच तुम्ही त्याच्यानावे पीपीएफ खाते उघडल्यास त्याच्या शिक्षणासाठी तुम्हाला तेच पैसे वापरता येतील. 

2  पीपीएफच्या खात्यावरील पैशांवर तुम्हाला कुठलाही कर द्यावा लागत नाही. 15 वर्षांनंतर तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यामधील रक्कम काढल्यास तुम्हाला ईईई सवलतीनुसार करमुक्त आणि पूर्ण व्याजाचा परतावा मिळतो. 

3 जर तुमच्या मुलास किंवा मुलीस 15 वर्षानंतर पीपीएफ खाते सुरूच ठेवायचे असल्यास तशीही सुविधा या योजनेत आहे. तसेच 15 वर्षानंतर या खात्यातून पूर्ण रक्कम किंवा केवळ व्याजही काढून घेता येऊ शकते. 

4 इन्कम टॅक्स अॅक्ट 80C च्या तुरतुदीचा फायदा घेण्यासाठी लहानपणीच त्यांचे पीपीएफ अकाऊंट सुरू करणे आवश्यक आहे. ज्यामुळे मुलाने पहिल्या जॉबची सुरुवात करण्यापूर्वीच त्यास या योजनेत गुंतवणूक करता येईल. 

5 तुमची पॉलिसी मॅच्यूअर होण्यापूर्वीही तुम्ही खात्यातील पैशांचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला किमान 7 वर्षापर्यंत वाट पाहावी लागले. मात्र, तुम्हाला चार वर्षांपर्यंत जमा झालेल्या रकमेच्या 50 टक्केच रक्कम काढता येणार आहे. तर एका आर्थिक वर्षात केवळ एकदाच ही रक्कम काढता येईल. 

टॅग्स :पीपीएफइन्कम टॅक्स