Join us

जिओचा केवळ 999 रूपयात 4G फोन उद्या होणार लॉन्च

By admin | Updated: March 2, 2017 21:14 IST

रिलायन्स जिओ उद्या आपले दोन फीचर फोन लॉन्च करणार आहे. हे दोन्ही फोन 4G असणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - रिलायन्स जिओ उद्या (दि.3) आपले दोन फीचर फोन लॉन्च करणार आहे. हे दोन्ही फोन 4G असणार आहेत. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट आणि अॅमॅझॉनवरून हे फोन खरेदी करता येणार आहेत.  याशिवाय दोन्ही फोन जिओ स्टोअरवरूनही खरेदी करता येतील.
 
किंमतीच्या बाबतीत दोन्ही फोन स्वस्त आहेत. एकाची किंमत 999 रूपये आहे तर दुसरा 1499 रूपयामध्ये  मिळेल. दोन्ही फोन टच स्क्रिन नसून त्यांना कि-पॅड असणार आहे.  1499 रूपयाच्या फोनबाबत जास्त माहिती मिळालेली नाही.  
 
999 रूपयाच्या फोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे तर सेल्फीसाठी VGA  कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये वाय-फाय देखील असणार आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये 8 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. फोनची बॅटरी 1800 mAH ची आहे. दोन्ही फोन केवळ जिओच्याच 4G नेटवर्कला सपोर्ट करणार असल्याचं वृत्त आहे.