Join us
Daily Top 2Weekly Top 5

4G ग्राहकांना 259 रूपयांत 10GB डेटा,एअरटेलची नवी ऑफर

By admin | Updated: October 19, 2016 17:04 IST

भारती एअरटेलने मोबाईल ग्राहकांसाठी 259 रूपयांत 10 जीबी 4 जी इंटरनेटच्या ऑफरची घोषणा केली. नवीन 4 जी स्मार्टफोन घेणा-यांसाठी ही ऑफर

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 19 - रिलायन्स जिओने मोफत इंटरनेट सेवा सुरू केल्यापासून देशातील टेलीकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच चुरस सुरू झाली आहे. भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलने मोबाईल ग्राहकांसाठी 259 रूपयांत 10 जीबी 4 जी इंटरनेटच्या ऑफरची घोषणा केली.  नवीन 4 जी स्मार्टफोन घेणा-यांसाठी ही ऑफर असणार आहे अशी माहिती कंपनीकडून बुधवारी देण्यात आली. यामध्ये ग्राहकाला 1 जीबी डेटा हा तात्काळ देण्यात येणार असून उर्वरीत 9 जीबी डेटा MyAirtel App मध्ये जाऊन ग्राहकांना मिळवता येईल. 28 दिवसांसाठी याची व्हॅलिडिटी असणार आहे.

भारतीय ग्राहकांसाठी ही नवी ऑफर घेऊन येताना अत्यंत आनंद होत आहे. नेटचा सर्वाधिक वापर करणा-यांचा विचार करून ही ऑफर आम्ही बाजारात आणली आहे अशी माहिती कंपनीचे संचालक अजय पुरी यांनी दिली.  कंपनीने गेल्या आठवड्यात गुजरात, मध्यप्रदेश आणि छत्तिसगडमध्ये या ऑफरची सुरूवात केली होती. चांगल्या प्रतिसादानंतर आता देशभरात ही सेवा सुरू करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.