Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशातील तेल वापरात ४.९ टक्के वाढ

By admin | Updated: December 30, 2014 01:03 IST

कच्च्या तेलाचा भाव पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर आल्यानंतर देशातील इंधन वापरात नोव्हेंबरमध्ये ४.९ टक्के वाढ नोंदली गेली आहे. डिझेलच्या विक्रीत वाढ झाल्याने हा बदल झाला.

नवी दिल्ली : कच्च्या तेलाचा भाव पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर आल्यानंतर देशातील इंधन वापरात नोव्हेंबरमध्ये ४.९ टक्के वाढ नोंदली गेली आहे. डिझेलच्या विक्रीत वाढ झाल्याने हा बदल झाला.पेट्रोलियम मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये इंधन खप ४.९ टक्क्याने वाढून १.३९ कोटी टन झाला. गेल्या वर्षी याच काळात हा खप १.३३ कोटी टन एवढा होता. देशात सर्वाधिक खप असलेल्या डिझेलची विक्री नोव्हेंबरमध्ये ३ टक्क्याने वधारून ६०.०२ लाख टन राहिली. यापूर्वीच्या दोन महिन्यात यात मोठी घट नोंदली गेली होती. ब्रेंट कच्च्या तेलाचा भाव सुमारे ६० डॉलर प्रति बॅरलवर आला आहे. पेट्रोलचा खप नोव्हेंबरमध्ये ३.६ टक्क्याने वाढून १५ लाख टन झाला व एप्रिल-नोव्हेंबरमध्ये ९.५ टक्क्याने वधारून १.२५ कोटी टन राहिला. आंतरराष्ट्रीय पातळीवर यंदा तेल दरात ४६ टक्के घट झाली आहे.