Join us
Daily Top 2Weekly Top 5

४.८० लाख कोटींची कर्जे बँकांनी केली माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:49 IST

देशभरातील बँकांनी मागील दहा वर्षात तब्बल ४.८० लाख कोटी रुपयांची कर्जे माफ (राइट आॅफ) केली आहेत.

मुंबई : देशभरातील बँकांनी मागील दहा वर्षात तब्बल ४.८० लाख कोटी रुपयांची कर्जे माफ (राइट आॅफ) केली आहेत. त्यामध्ये १.२३ लाख कोटी रुपयांसह स्टेट बँक आॅफ इंडिया अव्वल आहे. आयसीआरए या पत मानांकन देणाऱ्या कंपनीच्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे.अभ्यासानुसार, मार्च २०१८ पर्यंत मागील दहा वर्षात कर्जे माफ करणाºया पहिल्या १० बँकांचा आकडा ३ लाख २५ हजार ९८७ कोटी रुपये आहे. स्टेट बँकेने १ लाख २३ हजार १३७ कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. या दहा बँकांमध्ये खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस व आयसीआयसीआय या दोन बँकासुद्धा आहेत. या दोन बँकांनी अनुक्रमे ११,६८८ व ९,११० कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत.उद्योजकांना दिलेली कर्जे बुडित खात्यात गेल्यानंतर त्याची वसुली करण्याऐवजी ती माफ करण्याचा सपाटा सर्वच बँकांनी लावल्याचे या अभ्यासात दिसून येत आहे.>सर्वाधिक कर्जे चार वर्षातीलसर्वाधिक ३.५७ लाख कोटी रुपयांची कर्जे मोदी सरकारच्या चार वर्षांच्या काळात माफ करण्यात आली. त्यापैकी १.४४ लाख कोटी रुपयांची कर्जे २०१७-१८ या आर्थिक वर्षात (मार्च २०१८ पर्यंत) माफ करण्यात आली. एकूण दहा वर्षात सरकारी बँकांनी ४ लाख ५८४ कोटी व खासगी बँकांनी ७९ हजार ४९० कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत.>सामान्यांच्या पैसाउद्योजकांच्या खिशामध्ये‘बँकांकडून दिलेल्या एकूण कर्जात मोठ्या कर्जदारांचा वाटा ५४.८% असताना बँकेच्या ढोबळ एनपीएमध्ये या कर्जदारांचा हिस्सा ८५.६% आहे. बँकांमधील एकूण कर्जात सर्वाधिक कर्जे घेतलेल्या १०० कर्जदारांचा हिस्सा १५.२% आहे. पण याच अव्वल १०० कर्जदारांचा एनपीएतील वाटा तब्बल २६% असल्याचे रिझर्व्ह बँकेनेही त्यांच्या अहवालात म्हटले आहे. यावरुन सर्वसामान्यांनी बँकेत विश्वासाने ठेवलेला पैसा उद्योजकांच्या खिषात घातला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. - देवीदास तुळजापुरकर, सरचिटणीस,महाराष्टÑ बँक एम्प्लॉईज असोसिएशन