Join us  

‘अटल पेन्शन’मध्ये ४३०० कोटी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:09 AM

एकूण १.०८ कोटी खाती; खातेदार भरत नाहीत नियमितपणे पैसे

मुंबई : वयाच्या साठीनंतर निवृत्ती वेतनाचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारने नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. त्यात आतापर्यंत ४३०० कोटी रुपये जमा झाले आहेत. योजनेत देशभरात एकंदर १.०८ कोटी खाती काढली आहेत. पण यात खातेदारांकडून नियमित पैसे भरले जात नसल्याची चिंता अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.भविष्य निर्वाह निधी नियमन प्राधिकरणांतर्गत (पीएफआरडीए) केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. याअंतर्गत दरमहा ठराविक रक्कम भरल्यानंतर ६० व्या वर्षानंतर १००० ते ५००० रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे.याबाबत प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक के. मोहन गांधी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, कुठलेही ठोस निवृत्ती वेतन नसलेल्यांसाठी ही योजना चांगली आहे. यासाठीच योजनेचा विस्तार करताना आता लघु वित्त बँका व डिजिटल पेमेंट बँकांनाही आम्ही सोबत घेतले आहे. याखेरीज क्षेत्रीय ग्रामीण बँका आता पूर्ण जोमाने मार्केटींग करीत आहेत. पण मुख्य समस्या खात्यातील सातत्याची आहे. खातेदार नियमित पैसे भरत नसल्याचे दिसून येत आहे.दररोज १० ते १५ हजार नवीन खातीगांधी यांच्यानुसार, अटल पेन्शन योजनेत रोज १० ते १५ हजार नवीन खाती उघडली जात आहेत. आतापर्यंत उघडण्यात आलेल्या खात्यांमध्ये ४० टक्के महिला आहेत. मोठ्या शहरात खासगी कंपनीत काम करणाºयांना पेन्शनची सुविधा नसल्याने त्यांच्याकडून भरपूर खाती उघडली जात आहेत. पण आता ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले जाईल.

टॅग्स :व्यवसायपैसा