अकोला : कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी यावर्षी खासगी बाजारात आतापर्यंत ४१ लाख २९ हजार क्विंटलपेक्षा जास्त कापूस विकला असून, पणन महासंघाकडे १ लाख ७२ हजार ३८८, तर भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) २ लाख ९४ हजार ३३६ क्विंटल कापूस खरेदी केला आहे. आधारभूत किमतीपेक्षा १०० रुपये जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कापूस विकला आहे. यावर्षी कापसाचे चुकारे बँके त थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने चुकाऱ्यांना विलंब होऊन शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे वळला असल्याचे दिसून येते. सीसीआयने यावर्षी कापूस उत्पादक भागात ४८ कापूस खरेदी केंद्र सुरू केली असून, २ लाख ९४ हजार ३३६ क्विंटल कापूस खरेदीकेला. पणन महासंघाने ७९ खरेदी केंद्रे सुरू केली. कापसाचे हमी दर प्रतिक्विंटल ४१०० रुपये असले तरी प्रतवारीचे निकष लावून खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ३९०० ते ३९५० रुपये प्रतिक्ंिवटल दर मिळत आहेत. सीसीआय आणि पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रावर प्रतवारीचे निकष लावले जात असल्याचे बघून व्यापाऱ्यांकडून थेट गावात जाऊन कापूस खरेदी केला जात आहे. यावर्षीचा दुष्काळ आणि खरीप पिकांचे झालेले नुकसान झाले आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात कापसाला बोनस किंवा सामाजिक सुरक्षितता म्हणून दरवाढीची घोषणा होईल, यासाठी अनेक शेतकऱ्यांनी कापूस अद्याप विकलेला नाही.यावर्षी आतापर्यंत १ लाख ७२ हजार क्ंिवटल कापूस खरेदी केला असून, ५ डिसेंबरपर्यंतचे चुकारे बँकेत जमा केले आहेत. चुकारे मिळण्यास शेतकऱ्यांना सुरुवातीला अडचण वाटत असेल, पण ही योजना चांगली आहे.-डॉ. एन.पी. हिराणी,अध्यक्ष, महाराष्ट्र कापूस उत्पादकसहकारी पणन महासंघ, मुंबई
४१ लाख क्विंटल कापूस विकला व्यापाऱ्यांना
By admin | Updated: December 8, 2015 01:52 IST