Join us

‘मिराच’ सहारावर भरणार ४० कोटी डॉलरचा खटला

By admin | Updated: March 18, 2015 00:05 IST

अमेरिकन कंपनी मिराच कॅपिटलने आम्ही सहारा समूहाविरुद्ध ४० कोटी डॉलरच्या मानहानीचा खटला दाखल करण्याची तयारी करीत असल्याचे सांगितले.

न्यूयॉर्क : अमेरिकन कंपनी मिराच कॅपिटलने आम्ही सहारा समूहाविरुद्ध ४० कोटी डॉलरच्या मानहानीचा खटला दाखल करण्याची तयारी करीत असल्याचे सांगितले. सहारा समूहाबरोबरचा आर्थिक व्यवहार अपयशी ठरल्यामुळे आमचे भरून न निघणारे नुकसान झाले व आमच्या गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळला, असा मिराच कंपनीचा आरोप आहे.इकडे सहारा समूहानेदेखील २.०५ अब्ज डॉलरच्या या अपयशी ठरलेल्या व्यवहारात मिराचकडून फसवणूक आणि धोकेबाजी झाल्याचा आरोप केला आहे. आम्ही गेल्या महिन्यात मिराच कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रियाही सुरू केल्याचे सहाराचे म्हणणे आहे. मिराच आणि तिचे मुख्य कार्यकारी अधिकारी सारांश शर्मा यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे आणि इतका मोठा व्यवहार पूर्ण करण्याची आर्थिक कुवत नसल्यामुळे हा व्यवहार अपयशी ठरला. पर्यायाने अत्यंत मौल्यवान वेळ आणि संसाधने वाया गेली.