Join us  

मनरेगाच्या मजुरीत चार ते दहा टक्के वाढ, महाराष्ट्रात २९७ रुपये प्रतिदिन मिळतेय मजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 11:39 AM

महाराष्ट्रात मजुरी दर आता २९७ रुपये प्रतिदिन झाला आहे.

नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेंतर्गत विविध राज्यांमध्ये मजुरीचे दर सुधारित करण्यात आले असून, चार ते १० टक्के वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मजुरी दर आता २९७ रुपये प्रतिदिन झाला आहे.

आम्ही ४०० रुपये मजुरी देणार : राहुल गांधीकाँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, मनरेगात मजुरी ७ रुपयांनी वाढविण्यात आली असतानाही ते आता तुम्हाला इतक्या मोठ्या रकमेचे काय कराल असे विचारतील. ते आता धन्यवाद मोदी नावाची मोहीमही सुरू करतील. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रत्येक मजुराची दिवसाची मजुरी ४०० रुपये करणार आहे.

मनरेगाचे राज्यनिहाय दर (प्रतिदिन रुपयांत) राज्य    मजुरी    हरयाणा        ३७४अरुणाचल प्रदेश        २३४महाराष्ट्र        २९७नागालँड        २३४सिक्कीम        ३७४गोवा        ३५६आंध्र प्रदेश        ३००उत्तर प्रदेश        २३७उत्तराखंड        २३७पश्चिम बंगाल        २५०तामिळनाडू        ३१९तेलंगणा        ३०० बिहार        २२८गुजरात        २८०कर्नाटक        ३४९

देशातील एकूण बेरोजगारांपैकी ८३ टक्के तरुण का आहेत? वर्षाला २ कोटी नोकऱ्या कुठे आहेत? देशात ३० लाख सरकारी पदे का रिक्त आहेत? प्रत्येक परीक्षेचा पेपर का फुटतो? व्यावसायिकांचे १६ लाख कोटी माफ झाले मग  शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या का करत आहेत? -  प्रियांका गांधी,  महासचिव, काँग्रेस

टॅग्स :व्यवसाय