Join us  

होम लोन EMI मॅनेज करण्याच्या 4 खास पद्धती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2018 2:52 PM

होम लोन मिळाल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ईएमआयचं योग्य नियोजन करणे. हे न करता घर विकत घेणे म्हणजे सुखातलं दुखात टाकणे असंही होऊ शकतं.

होम लोन मिळाल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दर महिन्याला ईएमआयचं योग्य नियोजन करणे. हे न करता घर विकत घेणे म्हणजे सुखातलं दुखात टाकणे असंही होऊ शकतं. त्यामुळे होम लोन ईएमआय कशा मॅनेज करता येईल, याचे काही पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एकदा मोठी रक्कम जमा करा

बोनस किंवा इंन्शुरन्स पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर मिळालेल्या मोठ्या रक्कमेतून होम लोनचा एक भाग जमा करत रहायला हवं. उदाहरणार्थ 9 टक्के व्याज दराने 15 वर्षांसाठी तुम्ही 50 लाख रुपये होम लोन घेतल्यानंतर तीन वर्षांनी जर तुम्ही 1 लाख रुपये जमा कराल तर, तुम्ही व्याजाचे 1.9 लाख रुपये वाचवू शकता आणि ईएमआय पेमेंटचा वेळ 5 महिन्यांनी कमीही करु शकता. जर तुम्ही याचप्रकारे अशीच एकदम मोठी रक्कम जमा केली तर तुमचा ईएमआयचा कालावधी कमी होईल.  

व्याज कमी करण्यासाठी जास्त  ईएमआय

अनेकदा कमी ईएमआय ठेवण्याच्या नादात अनेकजण लोन चुकवण्याचा कालावधी वाढवून घेतात. त्यामुळे तुम्हाला जास्त व्याज द्यावं लागतं. उदाहरणार्थ 9 टक्के व्याज दराने 60 लाखांच्या होम लोनवर 20 वर्षांसाठी 53, 984 रुपयांची ईएमआय द्यावी लागते. जी 48, 277 रुपयांवर 30 वर्षांची होणार. म्हणजे केवळ 5, 707 रुपयांच्या कमी ईएमआयसाठी तुम्हाला 10 वर्ष अडकून रहावं लागतं. 

प्रत्येक वर्षी एक जास्त ईएमआय भरा

सुरुवातीला असे करणे कठिण होईल. पण, पुढे जाऊन असे केल्यास तुमचाच फायदा होणार.  जर तुम्ही प्रत्येक वर्षात एक जास्तीची ईएमआय भराल तर कर्जाची उरलेली रक्कम कमी होते. जरा विचार करा की, तुम्ही जर 10, 15 किंवा 20 वर्षांच्या होम लोनवर प्रत्येक वर्षी एक जास्त ईएमआय भराल तर किती फायदा होणार.

कमी व्याज दराची ऑफर असेल तर करा स्विच

होम लोन घेतल्यानंतर एखादी दुसरी बॅंक तुम्हाला कमी व्याज दराची ऑफर देत असेल आणि त्याने तुमचं कर्जाचं ओझं कमी होणार असेल तर याचा नक्कीच विचार करा. वेगवेगळ्या बॅंका किंवा वित्तीय संस्था नेहमीच वेगवेगळ्या ऑफर देत असतात. पण स्विच करणार असाल तर तुम्हाला पुन्हा पेपर वर्क करावं लागेल आणि फि सुद्धा भरावी लागेल.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँक