Join us

निराशाजनक वातावरणामुळे ४ महिन्यांचा तळ

By admin | Updated: May 4, 2015 00:45 IST

प रकीय वित्तसंस्थांवरील कर आकारणीचा रेंगाळलेला विषय, सौदापूर्तीसाठी झालेली मोठी विक्री, अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले

प रकीय वित्तसंस्थांवरील कर आकारणीचा रेंगाळलेला विषय, सौदापूर्तीसाठी झालेली मोठी विक्री, अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले निराशाजनक वातावरण, परकीय वित्तसंस्थांचा विक्रीचा जोर यामुळे मुंबई शेअर बाजारात सलग तिसऱ्या सप्ताहात घसरण झाली. निर्देशांकाने चार महिन्यांचा तळ गाठला आहे.मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताह पूर्णपणे मंदीचाच राहिला. एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता बाजार घसरताना दिसून आला. सप्ताअखेरीस मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ४२६.६३ अंश म्हणजेच १.५५ टक्कयांनी घसरून २७०११.३१ अंशांवर बंद झाला. सप्ताहाच्या अखेरीस काही प्रमाणात खरेदी झाल्याने बाजार २७ हजार अंशांची पातळी कायम राखू शकला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)१.४९ टक्कयांनी खाली आला. सप्ताअखेर तो १२३.७५ अंशांनी खाली येऊन ८१८१.५० अंशांवर बंद झाला. अन्य निर्देशांकांमध्येही घसरण झालेली पहावयास मिळाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ०.१८ आणि ०.५८ टक्कयांनी घट झाली. अन्य क्षेत्रीय निर्देशांकही खाली आले.परकीय वित्त संस्थांवर कर लावण्याचा मुद्दा अपेक्षेपेक्षा अधिक चिघळला असून त्याचा बाजारातील उलाढालीवर विपरित परिणाम होत आहे. दरम्यान काही संस्थांनी याबाबत सरकारविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.गतसप्ताहात एप्रिल महिन्याची सौदापूर्ती होती. यासाठी परकीय वित्तसंस्थांकडून विक्री झाल्याने बाजार खाली आला.सप्ताहाच्या अखेरीस अमेरिकन अर्थव्यवस्थेची आकडेवारी जाहीर झाली.ही आकडेवारी निराशाजनक असल्यामुळे बाजारावर पुढील सप्ताहात त्याचा परिणाम होईल. दरम्यान जागतिक बॅँकेने भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर हा वाढता राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र चलनवाढ वाढत जाण्याची भीती व्यक्त झाल्याने व्याजदर कपातीबाबत शंका निर्माण झाली आहे.