Join us

नोटाबंदीनंतर लघुउद्योगातील 35 टक्केंनी गमावल्या नोकऱ्या

By admin | Updated: January 10, 2017 16:41 IST

500 आणि 1 हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर 35 टक्के कामगारांना नोकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, 10 - 500 आणि  हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर लघुउद्योगातील 35 टक्के कामगारांना नोकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत. तसेचं कामगारांच्या महसूलातही 50 टक्केंनी घट झाली आहे. ऑल इंडिया मॅन्युफॅक्चर्स ऑर्गनायझेशनने काल ही आकडेवारी जाहीर केली आहे. नोटाबंदीवर ऑल इंडिया मॅन्युफॅक्चर्स ऑर्गनायझेशनचा हा तिसरा अभ्सास आहे. लवकरच चौथा अहवालही संस्था प्रसिद्ध करणार आहे.
 
नोटाबंदीनंतर 34 दिवसांत लघु उद्योगात काम करणाऱ्या 35 टक्केंना आपली नोकरी गमावावी लागली आहे. मार्च 2017 पर्यंत 60 टक्के लोकांची नोकरी तसेच 55 टक्के महसूलात घट होण्याची  शक्यता वर्तवण्यात आली आहे.