मुंबई : डिजिटल बँकिंग व्यवहारांचा आकडा चालू आर्थिक वर्षात ३३ कोटींच्या घरात जाईल. त्याद्वारे ७.५६ लाख कोटी रुपयांचे व्यवहार होतील, अशी अपेक्षा देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक आॅफ इंडियाने व्यक्त केली आहे.३१ मार्च २०१७ अखेर बँकेच्या डिजिटल बँकींग युझर्सची संख्या ३.०५ कोटी होती. त्यात आता आणखी वाढ झाली. २०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकेचे ६ लाख कोटी रुपयांचे २७.०६ कोटी व्यवहार झाले.बँकेने इंटरनेट बँकींग, पॉइंट आॅफ सेल, मोबाइल बँकींग आदींची व्याप्ती वाढवली. त्यामुळे सध्या २० टक्के व्यवहारच बँकेत होतात, असे बँकेने स्पष्ट केले.
स्टेट बँकेत ३३ कोटी डिजिटल व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 05:46 IST