Join us
Daily Top 2Weekly Top 5

३१९ कोटींचा कागद वाचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 00:22 IST

भारतीय रेल्वेने नोकरभरतीसाठी आॅनलाइन टेस्ट घेण्याचा मार्ग स्वीकारल्यामुळे बहुभाषिक प्रश्नपत्रिका छापण्यासाठी लागणारे ए-४

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय रेल्वेने नोकरभरतीसाठी आॅनलाइन टेस्ट घेण्याचा मार्ग स्वीकारल्यामुळे बहुभाषिक प्रश्नपत्रिका छापण्यासाठी लागणारे ए-४ आकारातील ३१९ कोटी कागद वाचले आहेत. एवढे कागद तयार करण्यासाठी ४ लाख झाडे तोडावी लागली असती. १४ हजार पदे भरण्यासाठी रेल्वेने देशातील ३५१ केंद्रांवर परीक्षा घेतली. ९२ लाख उमेदवार परीक्षेला बसले होते. तीन टप्प्यांत ही परीक्षा घेण्यात आली. अशा प्रकारची ही देशातील पहिलीच परीक्षा ठरली. ९२ लाखांपैकी २.७३ लाख उमेदवार दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरले. त्यातून ४५ हजार उमेदवार तिसऱ्या टप्प्यासाठी निवडण्यात आले. आॅनलाइन पद्धतीमुळे एकेका दिवसात या परीक्षा पार पडल्या.