Join us

आउटसोर्सिंगबद्दल ३१ लाख डॉलरचा दंड

By admin | Updated: March 26, 2016 01:18 IST

सरकारी कामाचे आउटसोर्सिंग एका भारतीय सब कॉन्ट्रॅक्टरला सोपविल्याबद्दल अमेरिकेच्या एक कंत्राटदाराला ३१ लाख डॉलरचा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे या

न्यू यॉर्क : सरकारी कामाचे आउटसोर्सिंग एका भारतीय सब कॉन्ट्रॅक्टरला सोपविल्याबद्दल अमेरिकेच्या एक कंत्राटदाराला ३१ लाख डॉलरचा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कामासाठी सरकार निधी देणार असताना हा प्रकार घडला.फोकस्ड टेक्नॉलॉजीज इमेजिंग सर्व्हिसेस या फर्मचे एकमेव मालक आणि माजी सहमालक ज्युली बेनवेअर यांनी २००८ ते २००९ या काळात मुंबईतील एका सब कॉन्ट्रॅक्टरला आऊटसोर्सिंग करून कायद्याचे उल्लंघन केल्याची कबुली दिली आणि एका समझोत्यातहत दंड आणि शुल्क भरण्यास सहमती दर्शविली. संबंधित विभागांनी म्हटले आहे की, भारतीय कंपनीने तपासात स्वेच्छेने पूर्ण सहकार्य केले. आपल्याला बेकायदेशीर काम सोपविण्यात आल्याची माहिती नव्हती, असेही भारतीय सबकॉन्ट्रॅक्टरने कबूल केले. आपल्याला देण्यात आलेले काम बेकायदेशीर असल्याचे कंपनीला किंवा कंपनीच्या एकाही कर्मचाऱ्याला माहीत नव्हते, असे तपासात आढळून आले आहे. १६ दशलक्ष लोकांशी संबंधित हे काम आऊटसोर्सिंगद्वारे करणे बेकायदेशीर कृत्य असल्याचा ठपका अधिकाऱ्यांनी ठेवला होता.