नवी दिल्ली : २०३२ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीवेग १० टक्क्यांपर्यंत जाऊन ती १० पद्म डॉलरची होईल, या काळात कोणीही गरीब राहणार नाही, असा दावा निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केला आहे.मुलकी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य नोकरशहाही उपस्थित होते. सध्याचा देशाचा आर्थिक वृद्धीचा वेग ७.६ टक्के असून, अर्थव्यवस्था १.७ पद्म डॉलरची आहे. याचवेळी त्यांनी २०३२ पर्यंत देशात १७५ दशलक्ष नवीन रोजगार निर्माण होतील असे सांगितले आणि दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या शून्य टक्के होईल, असा दावा केला.
२०३२ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था होणार महापद्म डॉलरची
By admin | Updated: April 22, 2016 02:46 IST