Join us  

आयपीओपूर्वी ‘ओला’मध्ये होणार २0% नोकरकपात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 2:11 AM

कॅब सेवादार कंपनी ओलाने आगामी दोन तिमाहींत १५ ते २0 टक्के नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : कॅब सेवादार कंपनी ओलाने आगामी दोन तिमाहींत १५ ते २0 टक्के नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नफ्याचे प्रमाण वाढविण्यासाठी कंपनीने नोकर कपातीचा मार्ग निवडला असल्याचे सूत्रांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, ६ अब्ज डॉलर मूल्य असलेली ओला कंपनी आयपीओ आणण्याचा विचार करीत असून, त्यापूर्वी कंपनीला नफ्यात आणण्याचे प्रयत्न व्यवस्थापनाकडून सुरू आहेत.सूत्रांनी सांगितले की, ओलाच्या पेरोलवर सध्या ५,८00 ते ६,000 लोक आहेत. यात ओला समूहातील ओला इलेक्ट्रिक मॉबिलिटी आणि ओला फिनान्शिअल सर्व्हिसेस या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या कंपन्यांत ८ ते १0 टक्के कर्मचाऱ्यांना फेरनियुक्त्या दिल्या जाऊ शकतात, तसेच ३५0 ते ४00 लोकांना थेट घरी पाठविले जाऊ शकते.‘एएनआय टेक्नॉलॉजीज’द्वारे संचालित करण्यात येणाºया ओलाने वित्त वर्ष २0१९ मध्ये आपला तोटा ५७ टक्क्यांनी कमी करून १,१६0 कोटी रुपयांवर आणला आहे. वित्त वर्ष २0१८ मध्ये तो २,६७६ कोटी रुपये होता. बंगळुरूस्थित कंपनीचा मार्च २0१९ अखेरीस शुद्ध महसूल २६ टक्क्यांनी वाढून १,८८५ कोटी रुपयांवर गेला.गरजेनुसार बदल्याओलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ओला समूहातील सर्व कंपन्यांची निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व संस्थांचा आकार प्रमाणबद्ध करण्यात येत आहे. कौशल्यात सुधारणा करण्यात येत असून, कर्मचाºयांना कौशल्यानुसार उपलब्ध जागेवर हलविण्यात येत आहे.

टॅग्स :ओलाटॅक्सीमुंबई