Join us

पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी २ लाख कोटी

By admin | Updated: March 1, 2016 03:31 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल २ लाख २१ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे जाहीर केले.

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल २ लाख २१ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे जाहीर केले. महत्त्वाचे म्हणजे देशभरातील वापरात नसलेली १६० विमानतळे पुन्हा सुरू करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.देशातील सुमारे एक लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधणीचे प्रकल्प रखडले होते, पण भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी त्यातील ८५ टक्के प्रकल्प मार्गी लावल्याचे सांगत जेटली यांनी महामार्गांच्या बांधणीसाठी ५५ हजार कोटी रुपये तरतूद करत असल्याचे जाहीर केले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी केंद्राचा वाटा म्हणून १९ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून राज्य सरकारच्या ४० टक्के वाट्याचा विचार करता ग्रामसडक योजनेवर यंदा एकूण २७ हजार कोटी रुपये खर्च होतील. वर्षभरात १० हजार किलोमीटरचे महामार्ग बांधण्यात येणार आहेत. रस्ते एकंदरीत महामार्ग व ग्रामीण भागातील रस्त्याटवर ९७ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.