Join us

पेटीएममध्ये क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास 2 % चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 13:21 IST

पेटीएम वॉलेटचा वापर करत असाल आणि क्रेडिट कार्डद्वारे पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकत असाल तर तुम्हाला त्यासाठी आता जास्त रक्कम मोजावी लागणार

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - तुम्हीपण पेटीएम वॉलेटचा वापर करत असाल आणि क्रेडिट कार्डद्वारे पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकत असाल तर तुम्हाला त्यासाठी आता जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यास 2 टक्के अतिरिक्त चार्ज द्यावा लागेल.  
 
पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे पेटीएमचा वापर वाढला. सध्या अनेकजण पेटीएमद्वारे पैसे स्वीकारतात आणि कोणतंही शुल्क न देता आपले पैसे बँकेत जमा करतात. त्याचा फटका कंपनीला बसतो. बँक ट्रान्झेक्शनसाठी  मोठी किंमत कंपनीला मोजावी लागते. याशिवाय अनेकजण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे भरुन ते पुन्हा आपल्या बँक खात्यात टाकतात. त्यामुळे कंपनीला नुकसान सोसावं लागतं. याशिवाय. काहीजण बॅंक ट्रान्झेक्शनच्या शुल्कातून पळवाट म्हणून पेटीएमचा वापर करत असल्याच्या तक्रारी कंपनीकडे आल्या होत्या.  त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. 
 
नेटबॅंकिंग आणि डेबिट कार्डच्या ट्रान्झेक्शनसाठी असलेल्या नियमांमध्ये कंपनीने कोणातही बदल केलेला नाही. त्यामुळे त्यासाठी कोणताही कर आकारला जाणार नाही.