Join us
Daily Top 2Weekly Top 5

१९... काटोल

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

सरकार विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

सरकार विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
काटोल : भाजप-शिवसेना युती सरकारच्या धोरणांच्या विरोधात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी काटोल येथील फल्ली मार्केटमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबा शेळके यांनी दिली.
यावर्षी नापिकी झाली. त्यातच युती सरकारच्या धोरणांमुळे शेतीमालाला समाधानकारक भाव मिळत नाही. शेतीमालाला चांगला भाव देण्याचे आश्वासन युतीतील नेत्यांनी दिले होते. मात्र, सत्ता येताच त्यांनी सदर आश्वासन पाळले नाही. पॅकेजच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. आघाडी सरकारच्या काही कल्याणकारी योजना युती सरकारने बंद केल्या आहेत. रॉकेलच्या कोट्यात ७२ टक्क्यांनी कपात केली. केशरी रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, असा आरोपही शेळके यांनी केला.
कापूस, सोयाबीनसह अन्य शेतीमालाला योग्य भाव मिळावा, केशरी रेशनकार्डधारकांचे धान्य पुन्हा सुरू करण्यात यावे, रॉकेलचा कोटा पूर्ववत करण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी ३ वाजता स्थानिक फल्ली मार्केटमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
***