लंडन : ब्रिटनमधील आपला पोलाद प्रकल्प विकण्यासाठी टाटा उद्योग समूहाने संभाव्य ग्राहक असलेल्या १९0 वित्तीय आणि औद्योगिक गुंतवणूकदारांशी संपर्क साधला आहे. हा विक्री व्यवहार पाहण्यासाठी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेची अतिरिक्त सल्लागार म्हणून नियुक्तीही टाटाने केली आहे. आशिया आणि अतिपूर्वेकडील ग्राहकांशी संपर्क करण्याची जबाबदारी बँकेवर सोपविण्यात आली आहे. केपीएमजी एलएलपी ही संस्था मुख्य सल्लागार आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँक तिच्या बरोबरीने काम करील. टाटा स्टील युरोपच्या लाँग प्रॉडक्ट्स बिझनेसचे चेअरमन बिमलेंद्र झा यांची टाटा स्टील युकेच्या सीईओपदी नेमणूक करण्यात आली आहे. टाटा उद्योग समूहाच्या वतीने अधिकृतरीत्या देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या सात दिवसांपासून टाटा स्टील युरोपचे सल्लागार संभाव्य ग्राहकांशी संपर्क करीत आहेत. १९0 वित्तीय आणि औद्योगिक गुंतवणूकदारांशी संपर्क करण्यात आला आहे.
ब्रिटिश प्रकल्प विक्रीसाठी टाटांची १९0 संस्थांना गळ
By admin | Updated: April 19, 2016 03:07 IST