Join us

सेन्सेक्सचा १७ महिन्यांचा उच्चांक

By admin | Updated: September 7, 2016 04:21 IST

वाहन आणि बँकिंग क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४४६ अंक वाढून १७ महिन्यांच्या उच्चांकावर गेला.

मुंबई : वाहन आणि बँकिंग क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४४६ अंक वाढून १७ महिन्यांच्या उच्चांकावर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १३३.३५ अंकांनी वाढला.३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. नंतर तो वाढतच गेला. थोड्या-फार चढ-उतारानंतर तो ४४५.९१ अंकांनी अथवा १.५६ टक्क्यांनी वाढून २८,९७८.0२ अंकांवर बंद झाला. ११ जुलैनंतरची ही सर्वांत मोठी वाढ ठरली आहे. त्या दिवशी सेन्सेक्स ४९९.७९ अंकांनी वाढला होता. राष्ट्रीर शेअर बाजाराचा निफ्टी १३३.३५ अंकांनी अथवा १.५१ टक्क्यांनी वाढून ८,९४३.00 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३0पैकी २५ कंपन्यांचे समभाग वाढले. ४ कंपन्यांचे समभाग घसरले. सन फार्माचे समभाग स्थिर राहिले. आशियाई बाजारांतही तेजीचे वातावरण दिसून आले. जपानचा निक्केई 0.२६ टक्क्यांनी, हाँगकाँगचा हँग सेंग 0.५८ टक्क्यांनी तर चीनचा शांघाय कंपोजिट 0.६१ टक्क्यांनी वाढला. युरोपीय बाजारांतही सकाळी तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. लंडनचा एफटीएसई, पॅरिसचा कॅक-४0 आणि फ्रँकफूर्टचा डॅक्स-३0 हे निर्देशांक 0.३ टक्क्यांपर्यंत वाढ दर्शवित होते. (प्रतिनिधी)1अमेरिकी रोजगारविषयक आकडेवारी गेल्या आठवड्यात जाहीर झाली. अमेरिकेतील रोजगाराची स्थिती अजून सुधारलेली नसल्याचे त्यातून समोर आले. त्यामुळे अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून इतक्यात तरी व्याज दरांत वाढ केली जाण्याची शक्यता नाही, हे स्पष्ट झाले. 2देशांतर्गत सेवा क्षेत्रातील वाढीचा दर साडेतीन वर्षांच्या उच्चांकावर गेला आहे. नव्या बिझनेस आॅर्डर्समध्ये सुधारणा झाली आहे. बाजारांची स्थिती सुधारली आहे. तसेच बाजारांनी गतीही घेतली आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन बाजाराने उसळी घेतली आहे. महागाईचा दर ५% राहणारनवी दिल्ली : किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर आॅगस्टमध्ये ५ टक्क्यांवर राहील. त्यामुळे आगामी पत धोरण आढाव्यात धोरणात्मक व्याजदरांत 0.२५ टक्क्याची कपात होऊ शकते, असे सिटी ग्रुपने म्हटले आहे. भाज्या आणि डाळींच्या किमतीत घसरण झाल्यामुळे महागाईचा दर घसरेल. जुलैमध्ये महागाईचा दर ६.१ टक्क्यांवर गेला होता.