Join us  

४२ लाख एमएसएमईंना १.६३ लाख कोटीचे कर्ज, अर्थ मंत्रालयाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 1:27 AM

बॅँकांनी बिगर बॅँकिंग वित्तीय संस्था, गृहकर्ज वितरण संस्थांना तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांना ४५ हजार कोटी रुपयांच्या कर्ज हमीयोजनेंतर्गत २५,०५५.५ कोटी रुपयांच्या पोर्टफोलिओ खरेदीलाही मंजुरी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांना एकवेळ कर्ज पुनर्रचना योजनेंतर्गत आतापर्यंत १.६३ लाख कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे केंंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे. ४२ लाख उद्योगांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे सांगण्यात आले.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात अलेल्या लॉकडाऊनमुळे एमएसएमर्इंना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यांचा भार हलका करण्यासाठी केंद्र सरकारने बॅँकांना या उद्योगांना एकवेळ कर्ज पुनर्रचना करू देण्याबाबत सूचना करण्यात आली होती.याशिवाय बॅँकांनी बिगर बॅँकिंग वित्तीय संस्था, गृहकर्ज वितरण संस्थांना तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांना ४५ हजार कोटी रुपयांच्या कर्ज हमीयोजनेंतर्गत २५,०५५.५ कोटी रुपयांच्या पोर्टफोलिओ खरेदीलाही मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय ४३६७ कोटी रुपयांच्या पोर्टफोलिओ खरेदीसाठीची चर्चा सुरू असून, त्यावरच लवकरात लवकर निर्णय होण्याची अपेक्षा आहे.बॅँकांकडून उद्योजकांना तातडीने कर्ज वितरण सुरू असल्याने त्यांना दैनंदिन खर्चासाठी रोकड चणचण जाणवत नसल्याचे अर्थ मंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.१.१८ लाख कोटीचे प्रत्यक्ष वितरणत्या योजनेंतर्गत देशातील ४२ लाख १ हजार ५७६ एमएसएमर्इंनी सार्वजनिक क्षेत्रातील विविध बॅँकांकडे कर्ज पुनर्रचनेसाठी अर्ज केले असून, त्यांना १,६३,२२६.४९ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. १० सप्टेंबरपर्यंत यापैकी २५,०१,९९९ उद्योगांना १,१८,१३८.६४ कोटी रुपयांचे कर्ज प्रत्यक्षात वितरितही झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :व्यवसाय