Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सेक्सचा १६ महिन्यांचा उच्चांक

By admin | Updated: September 3, 2016 02:55 IST

वाहन कंपन्यांत झालेल्या जोरदार खरेदीच्या बळावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी सुमारे १0९ अंकांनी वाढून १६ महिन्यांच्या उच्चांकावर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा

मुंबई : वाहन कंपन्यांत झालेल्या जोरदार खरेदीच्या बळावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी सुमारे १0९ अंकांनी वाढून १६ महिन्यांच्या उच्चांकावर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८,८00 अंकांच्या वर गेला. या आठवड्यात सेन्सेक्स ७४९.८६ अंकांनी अथवा २.६९ टक्क्यांनी, तर निफ्टी २३७.१0 अंकांनी अथवा २.७६ टक्क्यांनी वाढला. गेल्या दोन महिन्यांतील हा सर्वाधिक साप्ताहिक लाभ ठरला आहे. वाहन क्षेत्रात मारुती सुझुकीचे समभाग सर्वाधिक १.९८ टक्क्यांनी वाढले. आॅगस्टमध्ये कंपनीच्या विक्रीत १२.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचा लाभ कंपनीला मिळाला. महिंद्रा अँड महिंद्रा, हीरो मोटोकॉर्प, बजाज आॅटो यांचे समभागही वाढले. टाटा मोटर्सचे समभाग १.१३ टक्क्यांनी वाढले. भारती एअरटेल, आयडिया सेल्यूलर आणि रिलायन्स कम्युनिकेशन या कंपन्यांनी शुक्रवारी २.६६ टक्क्यांची जोरदार मुसंडी मारली. रिलायन्स जिओच्या घोषणेनंतर गुरुवारी या कंपन्यांचे समभाग आपटले होते. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स १0८.६३ अंकांनी अथवा 0.३८ टक्क्यांनी वाढून २८,५३२.११ अंकांवर बंद झाला. १६ एप्रिलनंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली आहे. त्या दिवशी सेन्सेक्स २८,६६६.0४ अंकांवर बंद झाला होता. काल सेन्सेक्स २८.६९ अंकांनी घसरला होता. निफ्टी ३५ अंकांनी अथवा 0.४0 टक्क्यांनी वाढून ८,८0९.६५ अंकांवर बंद झाला. (प्रतिनिधी)सोने, चांदी वाढलेसराफा बाजारातील चार दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला असून, दिल्लीत सोने २0 रुपयांनी वाढून ३0,९७0 रुपये तोळा झाले. चांदीही २00 रुपयांनी वाढून ४५,१00 रुपये किलो झाली. न्यूयॉर्कमध्ये सोने 0.३९ टक्क्यांनी वाढून १,३१३.६0 डॉलर प्रति औंस झाले. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २0 रुपयांनी वाढून अनुक्रमे ३0,९७0 रुपये आणि ३0,८२0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला.