नवी दिल्ली : दुबळा झालेला रुपया, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार संबंधांत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारांतून एप्रिल महिन्यात १५,५०० कोटी रुपये काढून घेतले आहेत.गेल्या मार्च महिन्यात रोखे बाजारात ११,६५४ कोटी रुपये आले होते व कर्ज बाजारातून ९ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम बाहेर गेली होती. गेल्या फेब्रुवारी महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी ११,६७४ कोटी रुपये देशाच्या भांडवली बाजारातून (रोखे व कर्ज) काढून घेतले होते.ताज्या आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी २ ते २७ एप्रिल दरम्यान रोखे बाजारातून ५,५५२ कोटी रुपये काढून घेतले आणि याच कालावधीत कर्ज बाजारातून १०,०३६ कोटी रुपये असे एकूण १५,५८८ कोटी रुपये (२.४ अब्ज डॉलर्स) काढून घेतले आहेत.
भांडवली बाजारातून १५,५०० कोटी माघारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 01:38 IST