नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात भाव उतरल्याने आणि रिझर्व्ह बँकेने अटी शिथिल केल्याने भारतात सोन्याची आयात ६१ टक्क्यांनी वाढली. चालू आर्थिक वर्षात एप्रिल-मे या अवधीत भारतात १५५ टन सोने आयात झाले.मागच्या वर्षी याच अवधीत ९६ टन सोने आयात झाले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा भाव गेल्या काही महिन्यांपासून उतरत आहे. ३० जुलै रोजी न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव १,०९५.१० डॉलर (प्रति औंस) होता.वस्तू आणि सेवा आयातीचे मूल्य निर्यातीपेक्षा अधिक होणे म्हणजेच चालू खात्यातील तूट होय. २०१४-१५ मध्ये चालू खात्यातील तूट जीडीपीच्या १.३ टक्के (२७.५ अब्ज डॉलर) होती. २०१३-१४ मध्ये हे प्रमाण १.७ टक्के (३२.४ अब्ज डॉलर) होते.
१५५ टन सोने आयात
By admin | Updated: August 2, 2015 22:04 IST