Join us  

राजधानी, दुरंतोसह १५० गाड्यांचे खासगीकरण होणार? सर्वाधिक महसूल देणाऱ्या गाड्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 6:28 AM

‘भारतीय रेल्वेची शान’ असे बिरुद मिरवणा-या राजधानी, दुरंतो, तेजससह १५० एक्स्प्रेसचे खासगीकरण करण्याबाबत रेल्वे विचाराधीन असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिका-याने दिली.

- कुलदीप घायवटमुंबई : ‘भारतीय रेल्वेची शान’ असे बिरुद मिरवणा-या राजधानी, दुरंतो, तेजससह १५० एक्स्प्रेसचे खासगीकरण करण्याबाबत रेल्वे विचाराधीन असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली. विशेष म्हणजे यातील बहुतांशी गाड्या सर्वाधिक महसूल देणाºया आहेत.आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दिल्ली-लखनऊ तेजस एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस या गाड्या खासगी तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. त्यापाठोपाठ मध्य रेल्वेसह वेगवेगळ्या मार्गांवर राजधानी, दुरंतो आणि तेजससह १५० एक्स्प्रेस खासगी तत्त्वावर चालविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. तर याबाबत आमच्याकडे कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती आली नसल्याचे आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.भारतीय रेल्वे किमान प्रवासी सुविधांसह ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्णांसाठी विशेष सवलती अल्पदरात उपलब्ध करून देते. मात्र, खासगी एक्स्प्रेसमध्ये अशा सुविधा देण्यात येणार नसल्याने ज्येष्ठ नागरिक, रुग्णांचे प्रचंड हाल होतील. त्याशिवाय खासगी एक्स्प्रेसचे भाडे लवचीक स्वरूपाचे असेल. म्हणजेच गर्दीच्या वेळी, सणासुदीच्या काळात तिकिटाचे दर जास्त असतील, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.कामगार संघटनांचा विरोध!भारतीय रेल्वे अल्पदरात सेवा पुरविते. मात्र खासगीकरण झाल्यास प्रवाशांचे प्रचंड नुकसान होणार आहे. प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे कायम स्वागत केले जाईल. मात्र प्रवाशांची लूट करणाºया खासगीकरणाला विरोध असल्याचे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी सांगितले. तर जादा महसूल देणाºया एक्स्प्रेस खासगी तत्त्वावर चालविण्यास सुरुवात झाली आहे. याला संघटनेचा कायमच विरोध असेल, असे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे उपाध्यक्ष अमित भटनागर यांनी सांगितले.

टॅग्स :भारतीय रेल्वे