१५ कोटींच्या रस्त्यांना ग्रहण सिमेंट रस्त्यांसाठी निविदाच नाहीत!
By admin | Updated: October 24, 2014 23:12 IST
अकोला : गतवर्षीच्या पावसाळ्यात दुरवस्था झालेल्या रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडून प्राप्त १५ कोटींच्या विकास कामांना ग्रहण लागले आहे. प्राप्त अनुदानातून १८ रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल. यामधील १२ डांबरीकरणाचे रस्ते वगळल्यास उर्वरित सहा सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी निविदाच सादर करण्यात आली नसल्याची माहिती आहे. या संदर्भात मनपा प्रशासनही फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे.
१५ कोटींच्या रस्त्यांना ग्रहण सिमेंट रस्त्यांसाठी निविदाच नाहीत!
अकोला : गतवर्षीच्या पावसाळ्यात दुरवस्था झालेल्या रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडून प्राप्त १५ कोटींच्या विकास कामांना ग्रहण लागले आहे. प्राप्त अनुदानातून १८ रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल. यामधील १२ डांबरीकरणाचे रस्ते वगळल्यास उर्वरित सहा सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी निविदाच सादर करण्यात आली नसल्याची माहिती आहे. या संदर्भात मनपा प्रशासनही फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे.गतवर्षी २०१३ मध्ये अतिवृष्टीमुळे शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागली. काही मोजके सिमेंट काँक्रीटचे रस्ते वगळल्यास संपूर्ण शहरात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे नीट पायी चालणेदेखील कठीण झाले असून, याचा सर्वाधिक त्रास शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिकांना सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असून, मनपा प्रशासनाला सर्वसामान्य अकोलेकरांसोबत क ोणतेही सोयर सुतक नसल्याचे दिसत आहे. रस्त्यांची स्थिती लक्षात घेता, तत्कालीन मनपा आयुक्त दीपक चौधरी यांच्या कार्यकाळात शासनाने १५ कोटींचे अनुदान मंजूर करीत तत्काळ वितरित केले. यावर मनपाने नियोजन करून निविदा प्रक्रिया पूर्ण करणे भाग होते. मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आजपर्यंत एक-दोनदा नव्हे तर चक्क पाच वेळा निविदा प्रकाशित केल्या. १८ रस्त्यांपैकी १२ डांबरीकरणाचे रस्ते वगळल्यास सिमेंट काँक्रीटच्या सहा रस्त्यांसाठी आजपर्यंत निविदा अर्ज प्राप्त झाले नसल्याची चिंताजनक स्थिती आहे. आचारसंहिता संपल्यानंतर लगेच १५ कोटींच्या रस्ते दुरुस्तीला सुरुवात होईल, असा दावा मनपातील वरिष्ठ अधिकार्यांनी केला होता. रस्त्यांची रखडलेली निविदा प्रक्रिया लक्षात घेता, प्रशासनाचा दावा कितपत खरा ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बॉक्स...मूळ मुद्यांना बगलशासनाकडून विकास कामांसाठी किमान ४८ कोटींचे अनुदान मनपाला प्राप्त आहे. या अनुदानातून प्रामाणिकपणे ठोस कामे होणे अपेक्षित होते. सुरुवातीला कर्तव्यदक्षतेचा आव आणणार्या मनपातील वरिष्ठ अधिकार्यांनी बोलघेवडेपणात वेळ घालवला. फोर-जीसाठी अनुकूल अतिक्रमण हटाव मोहिमेच्या माध्यमातून वारेमाप प्रसिद्धी लाटली. वरिष्ठ अधिकार्यांनी शहर विकासाच्या मूळ मुद्यांना बगल दिल्याचा आरोप अकोलेकरांमध्ये सुरू झाला आहे.कोट...आम्ही सहा सिमेंट रस्त्यांसाठी निविदा प्रकाशित केली होती. दोन सिमेंट रस्त्यांसाठी निविदा प्राप्त झाली असून, येत्या २७ ऑक्टोबरला दोन्ही निविदा उघडल्या जातील. -अजय गुजर, शहर अभियंता मनपा