Join us

नीलकंठ बँकेच्या सभासदांना 13 टक्के लाभांश

By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST

सोलापूर: नीलकंठ को-ऑप. बँकेने चालू आर्थिक वर्षात सभासदांना 13 टक्के लाभांश देणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष जवाहरलाल मुनोत यांनी जाहीर केले.

सोलापूर: नीलकंठ को-ऑप. बँकेने चालू आर्थिक वर्षात सभासदांना 13 टक्के लाभांश देणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष जवाहरलाल मुनोत यांनी जाहीर केले.
बँकेच्या 17 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. बँकेने 100 कोटींच्या ठेवीचा पल्ला पूर्ण केला असून, संस्थापक विश्वनाथ करवा यांनी येत्या दोन, तीन महिन्यात पुणे रोड, बाळे येथे सर्वसुविधांयुक्त शाखा सुरू करणार असल्याचे सांगितले. सभासदांच्या गुणवंत पाल्याचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष शरद कालाणी, संचालक रमेशचंद्र राठी, विजयकुमार उपाध्ये, बाबुभाई मेहता, पुरुषोत्तमदास बलदवा, विष्णुदास बंग, चंद्रकांत तापडिया, जयनारायण भुतडा, अशोक जैन, सुभाष थंबद, बालकृष्ण कटकम, नागेश येदुर, किरण शेरखाने, पद्मा भुतडा, पुष्पा कासट, रितेश चंपक, शरद डागा, महेश अग्रवाल उपस्थित होते.
फोटो ओळी::::::::::::::::
नीलकंठ को-ऑप. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना संस्थापक विश्वनाथ करवा. यावेळी सुभाष थंबद, जयनारायण भुतडा, चंद्रकांत तापडिया, विजयकुमार उपाध्ये, बाबुभाई मेहता, पुरुषोत्तमदास बलदवा, उपाध्यक्ष शरद कालाणी, जवाहरलाल मुनोत.