Join us  

११९ भारतीयांचे ५ काेटींपेक्षा जास्त दान, हे आहेत देशातील सर्वात माेठे दानशूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 12:02 PM

संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल ८ हजार ४४५ काेटी रुपयांचे दान

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतातील अब्जाधीशांनी वर्ष २०२३ मध्ये माेठ्या प्रमाणावर दान केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दान देणाऱ्या अब्जाधीशांच्या संख्येत ५९ टक्के वाढ झाली आहे.  ३१ मार्च २०२३ राेजी संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल ८ हजार ४४५ काेटी रुपयांचे दान देण्यात आले. त्यात ११९ भारतीयांनी ५ काेटी रुपयांपेक्षा जास्त दान दिले आहे.

एचसीएल टेक्नाॅलाॅजीचे शिव नादर हे देशातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी तब्बल २ हजार ४२ काेटी रुपयांचे दान दिले आहे. हुरून इंडियाची दानशूर व्यक्तीची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात ही माहिती दिली आहे.

  • झीराेधाचे कामत बंधू सर्वात तरुण दानशूर ठरले आहेत. त्यांनी ११० काेटींचे दान दिले आहे.
  • १०० काेटींपेक्षा जास्त दान ११४ भारतीयांनी दिले आहे. ५० काेटींपेक्षा जास्त दान २४ भारतीयांनी दिले. २० काेटीपेक्षा जास्त दान ४७ भारतीयांनी दिले.

--------------------------वर्ष    उद्याेगपती    दान२०२३     १९९     ८,४४५--------------------------

सर्वाधिक दान देणाऱ्यांमध्ये टाॅप ३

महिलांमध्ये आघाडीवर काेण?

  • १७० काेटी- राेहिणी निलेकणी
  • २३ काेटी- लीना गांधी
टॅग्स :व्यवसायमुकेश अंबानीअझिम प्रेमजीशिव नाडर