Join us

नवीन वर्षात १०.८ टक्के वेतनवाढ?

By admin | Updated: November 27, 2015 00:04 IST

औद्योगिक क्षेत्रातील उलाढाली फारशा उत्साहजनक नसतानाही २०१६ मध्ये भारतीय कर्मचाऱ्यांना वेतनात १०.८ टक्के वेतनवाढीची अपेक्षा करता येईल

नवी दिल्ली : औद्योगिक क्षेत्रातील उलाढाली फारशा उत्साहजनक नसतानाही २०१६ मध्ये भारतीय कर्मचाऱ्यांना वेतनात १०.८ टक्के वेतनवाढीची अपेक्षा करता येईल. टॉवर्स वॅटसनच्या २०१५-२०१६ च्या आशिया प्रशांत वेतन अर्थसंकल्प योजना अहवालानुसार भारतात वेतनामध्ये १०.८ टक्के वाढीची अपेक्षा आहे. ६.१ टक्के चलनवाढीला त्यात समाविष्ट केले तर २०१६ मध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन ४.७ टक्के वाढेल. मागच्या वर्षी ही वाढ ४.५ टक्के होती व चलनवाढ ५.९ टक्के. भारताच्या औद्योगिक क्षेत्रात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ५८ टक्के कर्मचारी तिसऱ्या तिमाहीत कमी उत्साही असतानाही ही वेतनवाढ होणार आहे. कंपन्यांचे मर्यादित वेतन अंदाजपत्रक खूपच समजून उमजून खर्च करण्याची गरज आहे.