Join us

10 संस्थांची 88 अन्वये होणार चौकशी

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

जिल्हा उपनिबंधक; दोन संस्था निदरेष, दोनचे अहवाल प्रलंबित

जिल्हा उपनिबंधक; दोन संस्था निदरेष, दोनचे अहवाल प्रलंबित
फोटो- सहकार लोगो..
सोलापूर: जिल्?ातील 11 सहकारी संस्थांची 83 कलमान्वये चौकशी पूर्ण झाली असून, 10 संस्थांची 88 अन्वये चौकशी करण्याची शिफारस केली आहे. दोन संस्थांची चौकशी करण्याची गरज नसल्याचे आढळले असल्याचे जिल्हा उपनिबंधक बिभिषण लावंड यांनी सांगितले.
अनियमितता आढळलेल्या जिल्?ातील 17 सहकारी संस्थांची चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे. चौकशी पूर्ण झालेल्यांमध्ये भावसार नागरी पतसंस्था सोलापूर व क्रांतीसूर्य मागास औद्योगिक सहकारी संस्था टेंभुर्णीत अनियमितता आढळली नाही. व्यंकटेश्वर मागास संस्था बार्शी व भैरवनाथ सहकारी भाडेकरु मालकी गृह. संस्था बार्शी यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत.
गणेश पतसंस्था शेंद्री, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील पतसंस्था बारलोणी, दि. सोलापूर सोशल अर्बन बँक, प्रियदर्शनी पतसंस्था, मोहोळ, एस.टी. एम्प्लॉईज को. क्रेडिट सोसायटी, बोराळे विकास सोसायटी, लवंगी विकास सोसायटी, सिद्धेश्वर प्लॉट ओनर्स सह.गृह. संस्था सोलापूर, गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सह.गृह. संस्था, या संस्थांची 88 अन्वये चौकशी करण्याची शिफारस केली आहे. जय र्शीगणेश करमाळा, भगवंत नागरी पतसंस्था बार्शी, संत रोहिदास चर्मोद्योग कुरनूर व सीना-भीमा वृक्ष उत्पादक संस्थेची चौकशीची प्रक्रिया सुरू आहे.
चौकट
कलम 83 व कलम 88
कलम 83 अन्वये चौकशी करताना नक्की अनियमितता आहे का?, याची शहानिशा केली जाते. 83 अन्वयेच्या तपासणीत अनियमितता आढळली तर कलम 88 नुसार चौकशी केली जाते. 88 कलमान्वये जबाबदारी निश्चित केली जाते.