Join us  

१ हजार कोटींचे दान; शिव नाडर देशात सर्वाधिक दानशूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 1:14 PM

अझीम प्रेमजी दुसऱ्या स्थानी, अदानींच्या देणग्यांमध्ये ४६ टक्के वाढ

नवी दिल्ली : देशात सर्वाधिक दान करणाऱ्या उद्याेजकांची यादी हुरुन इंडियाने जाहीर केली आहे. त्यात आयटी क्षेत्रातील कंपनी एचसीएल टेक्नाॅलाॅजीसचे अध्यक्ष शिव नाडर हे अग्रस्थानी आहेत. त्यांनी गेल्या वर्षात १,१६१ काेटी रुपयांचे दान केले आहेत. तर ‘विप्राे’चे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यांनी ४८४ काेटी रुपयांचे दान दिले आहे. हुरुनच्या यादीत असलेल्या उद्याेजकांनी दरराेज सरासरी ३ काेटी रुपये दान दिले आहे. शिक्षण, आराेग्य सेवा, सामाजिक तसेच आपत्ती काळातील मदत या प्रमुख कारणांसाठी मदत देण्यात आली आहे.शिव नाडर - गेल्या ३ वर्षांमध्ये ३,२१९ काेटींची मदत केली. 

  • अझीम प्रेमजी व कुटुंबीयांनी केलेल्या देणग्यांमध्ये यावेळी ९५% घट झाली असली, तरी ३ वर्षांमध्ये १८,१०१ काेटी रुपये दान केले आहेत.
  • मुकेश अंबानी - रिलायन्स उद्याेग समुह व कुटुंबीय तिसऱ्या स्थानी कायम आहेत. त्यांनी ४११ काेटींचे दान केले आहे. त्यात यावेळी २९% घट झाली आहे. 
  • कुमार मंगलम बिर्ला व कुटुंबीयांनी २४२ काेटी रुपयांचे दान केले आहे. मात्र, यंदा त्यात ३६ टक्के घट झाली आहे.
  • आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गाैतम अदानी यांचे या यादीत ७वे स्थान आहे. त्यांनी १९० काेटींचे दान केले आहे. त्यात यंदा सर्वाधिक ४६% वाढ झाली आहे. 
टॅग्स :शिव नाडरमुकेश अंबानीगौतम अदानी