Join us  

बचतीची ही पद्धत वापरून पाहा, २० हजार कमवत असाल तरी जमवू शकता १ कोटींपेक्षा जास्त रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 2:59 PM

बचत ही एक सवय आहे, तुमचं उत्पन्न कितीही असलें तरी तुम्ही नक्कीच बचत केली पाहिजे, असं आर्थिक तज्ज्ञांचं मत आहे.

जेव्हा जेव्हा बचतीची चर्चा होते तेव्हा बरेच आपण कमी पगारात कशी बचत करायची असा प्रश्न विचारत असतात. पण बचत ही एक सवय आहे, तुमचं उत्पन्न कितीही असलें तरी तुम्ही नक्कीच बचत केली पाहिजे, असं आर्थिक तज्ज्ञांचं मत आहे. तसंच, वाचवलेले पैसे घरी ने ठेवता ते गुंतवले पाहिजेत. कारण गुंतवलेले पैसे वेळेनुसार वाढत असतात. बचत आणि गुंतवणुकीची ही सवय जर तुम्ही अंगी कारली, तर कमी पगार असलेले लोकही दीर्घकाळात चांगली रक्कम जमा करू शकतात.पण अशा स्थितीत प्रश्न पडतो की बचत कशी आणि किती करायची? आर्थिक नियम म्हणतो की प्रत्येक व्यक्तीने त्याच्या उत्पन्नातील २० टक्के बचत केली पाहिजे. जर तुम्ही २० टक्के बचत करून गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर तुम्ही दरमहा २०००० रुपये कमवत असाल तरी, एवढ्या कमी पगारातही कोट्यधीश होऊ शकता. पाहूया कसं.२० हजारातून किती वाचवाल? 

समजा तुम्ही दरमहा २० हजार रुपये कमावता, तर तुमच्या उत्पन्नाच्या २० टक्के रक्कम म्हणजे ४००० रुपये आहे. आर्थिक नियमांनुसार, तुम्ही दरमहा ४ हजार रुपये वाचवले पाहिजेत आणि १६ हजार रुपयांनी तुमच्या घरातील सर्व खर्च आणि गरजा भागवाव्यात. तुम्ही हे ४ हजार रुपये कोणत्याही परिस्थितीत गुंतवले पाहिजे आणि ही गुंतवणूक दीर्घकाळ चालू ठेवावी. 

कुठे कराल गुंतवणूक? 

आज गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीसाठी अतिशय चांगले मानले जातात. एसआयपीद्वारे यामध्ये गुंतवणूक करून, तुम्ही दीर्घकाळात मोठा फंड जोडू शकता. तज्ज्ञांचं मत आहे की एसआयपीमध्ये सरासरी परतावा १२ टक्क्यांपर्यंत आहे, जो इतर कोणत्याही स्कीमपेक्षा खूप जास्त आहे. 

समजा तुम्ही एसआयपीमध्ये दर महिन्याला ४००० रुपये गुंतवले आणि ही गुंतवणूक २८ वर्षे चालू ठेवली, तर २८ वर्षात तुम्ही एकूण १३,४४,००० रुपये जमवाल आणि तुम्हाला परतावा म्हणून ९६,९०,३३९ रुपये मिळतील. अशा परिस्थितीत, तुम्हाला २८ वर्षांत एकूण १,१०,३४,३३९ रुपये मिळतील आणि तुम्ही ही गुंतवणूक दोन वर्षे म्हणजे ३० वर्षे चालू ठेवल्यास, तुम्ही एसआयपीद्वारे ३० वर्षांत १,४१,१९,६५५ रुपये जमवू शकता. 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूक