Join us  

जबरदस्त Mutual Fund : १०००० रुपयांच्या SIP चे झाले ₹४ कोटी, गुंतवणूकदार मालामाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 9:29 AM

या फंडाचा 25 वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि त्याने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिलाय.

Mutual Fund Investment: आज आम्ही तुम्हाला अशा एका म्युच्युअल फंड कंपनीबद्दल सांगत आहोत ज्यानं दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. आम्ही ICICI प्रुडेन्शियल लार्ज आणि मिडकॅप फंडाबद्दल बोलत आहोत. या फंडाचा 25 वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि त्याने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिलाय. हा फंड लार्ज कॅप आणि मिडकॅप कंपन्यांमधून प्रत्येकात 35 टक्के गुंतवणूक करतो.

जर एखाद्या गुंतवणूकदारानं जुलै 1998 मध्ये (फंडाची सुरुवात) 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली असेल, तर ती रक्कम 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत 72.15 लाख रुपये झाली असती, म्हणजेच 18.34 टक्क्यांच्या CAGR दराने परतावा त्यांना परतावा मिळाला असता. दरम्यान, फंडाच्या बेंचमार्क निफ्टी लार्ज मिडकॅप 250 टीआरआयमधील अशाच गुंतवणुकीने 14.64 टक्क्यांचा CAGR परतावा दिला आहे जो केवळ 32.18 लाख रुपये आहे.

एसआयपी गुंतवणूकीवर रिटर्न

जर एखाद्यानं ICICI लार्ज आणि मिड कॅप फंडमध्ये 10,000 रुपयांची मासिक SIP केली असती, तर गुंतवणूकीची रक्कम 30.50 लाख रुपये झाली असती. 30 नोव्हेंबर 2023 रोजी त्याचे मूल्य 4.03 कोटी रुपयांपर्यंत झालं असतं. म्हणजेच 16.91 टक्क्यांच्या सीएजीआर दरानं त्यांना परतावा मिळाला असता. बेंचमार्कमधील समान गुंतवणुकीने केवळ 15.04 टक्क्यांच्या सीएजीआर दरानं परतावा दिला आहे.

या फंडाने गेल्या एक आणि तीन वर्षांत 20.56% आणि 27.66% परतावा दिला आहे. याच कालावधीत, बेंचमार्कनं 19.92% आणि 23.34% परतावा दिला तर लार्ज आणि मिडकॅप श्रेणीतील सरासरी परतावा 18.83% आणि 21.96% होता.

फंडाबाबात माहिती

या फंडाचा एयूएम 9,636.74 कोटी रुपये आहे. हा फंड बाजारात लिस्ट असलेल्या टॉप 250 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. त्यामुळे तुमची गुंतवणूक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा एक चांगला फंड ठरू शकतो. हा मूळात इक्विटी केंद्रित फंड आहे.

(टीप - यामध्ये फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूक