Join us  

Index Funds: तुमच्या पोर्टफोलिओत 'इंडेक्स फंड' का असावेत?... सहा प्रमुख कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 6:52 PM

जी-20 देशातील सगळ्यात वेगाने वाढणारा देश म्हणून भारत पुढे येतो आहे. जशी भारताची प्रगती होते तसाच इन्व्हेस्ट करणाऱ्यांना सुद्धा शेअर मार्केटच्या माध्यमातून त्याचा लाभ मिळत असतो.

भारताची आर्थिक प्रगती आणि वाढते मार्केट

भारताची अर्थव्यवस्था जगातील अन्य देशांच्या तुलनेत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येत आहे. 2023-24 या वर्षासाठी रियल जीडीपी मधील वाढ 7.3% दराने होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 2022-23 या वर्षातील 7.2% यापेक्षा हा वाढीचा दर जास्त आहे. भारताच्या वाढीबद्दल कुणाच्याच मनात शंका येण्याचे कारण नाही. भारतीय शेअर बाजारांनी गेल्या काही दिवसात एक ऐतिहासिक टप्पा ओलांडला आणि चार ट्रिलियन डॉलर्स(1) एवढे मार्केट कॅप म्हणजेच बाजार मूल्य असलेले शेअर मार्केट म्हणून भारतीय शेअर मार्केटची ओळख तयार झाली. देशाच्या आर्थिक प्रगतीचा स्टॉक मार्केटच्या वाढीशी थेट संबंध असतोच. 2030(2) पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 7.3 ट्रिलियन डॉलर एवढी झालेली असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

जी-20 देशातील सगळ्यात वेगाने वाढणारा देश म्हणून भारत पुढे येतो आहे. जशी भारताची प्रगती होते तसाच इन्व्हेस्ट करणाऱ्यांना सुद्धा शेअर मार्केटच्या माध्यमातून त्याचा लाभ मिळत असतो. हाच लाभ मिळवण्याचे सोपे साधन म्हणजे इंडेक्स फंड होय. भारताच्या प्रगतीतील हिस्सेदार होण्याची सुवर्णसंधी इंडेक्स फंड देत असतात. आपल्या पोर्टफोलिओतील खात्रीशीर पर्याय म्हणून इंडेक्स फंड पुढे येतात. 

इंडेक्स फंड समजून घेऊया 

गुंतवणूक करण्यातील पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणजेच इंडेक्स फंड होय. एस अँड पी बी एस ई सेन्सेक्स किंवा निफ्टी 50 यांचा हुबेहूब पोर्टफोलिओ इंडेक्स फंड तयार करतात. जसे शेअर्स निफ्टी-फिफ्टी मध्ये असतील तसेच निफ्टी इंडेक्स फंडामध्ये असतात यालाच पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट असे म्हणतात. यामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ज्या प्रमाणात शेअर्स असतात त्याच प्रमाणात तुमच्या इंडेक्स फंडाचा फंड मॅनेजर पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करतो. इंडेक्स फंडात गुंतवणूक करण्यासाठी कोणते शेअर्स निवडायचे याचा जास्त अभ्यास फंड मॅनेजरला करावा लागत नाही. यामुळे गुंतवणूकदारांसाठी कमी खर्चात मिळणारा आणि डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ असलेला म्युच्युअल फंड म्हणजे इंडेक्स फंड असतो. कमीतकमी मानवी हस्तक्षेप आणि निर्णय घेण्यातील धोका विचारात घेता इंडेक्स फंड सगळ्यात महत्त्वाचे असतात.

इंडेक्स फंडातील विविध प्रकार 

तुम्हाला कशी गुंतवणूक करायची आहे ? त्यानुसार इंडेक्स फंड सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. 

>>मार्केट कॅपवर आधारित फंडः कंपन्यांच्या आकारानुसार लार्ज कॅप मिडकॅप आणि स्मॉल कॅप म्हणजेच मोठे मध्यम आणि लहान अशा आकारावर कंपन्यांची विभागणी केली असते. त्यानुसार गुंतवणूक करणारा फंड, सेक्टर फंड - सेन्सेक्स किंवा निफ्टी पैकी कोणत्याही शेअरची निवड न करता बँकिंग, टेक्नॉलॉजी, फार्मा अशा एखाद्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा इंडेक्स फंड 

>>फॅक्टर बेस्डः ग्रोथ, व्हॅल्यू किंवा डिव्हिडंड अशा प्रकारांमध्ये गुंतवणूक करणारा इंडेक्स फंड.

>>इंडेक्स मधील समसमान गुंतवणूकः एखाद्या इंडेक्स मध्ये इक्वल वेट म्हणजेच समसमान आकारात गुंतवणूक या फंड प्रकारात केली जाते. 

>>कमोडिटी फंडः सोने, चांदी, क्रूड ऑइल किंवा अन्य कमोडिटी मध्ये गुंतवणूक करणारा फंड.

इंडेक्स फंडाचे फायदे कोणते?

>> सर्व क्षेत्रात गुंतवणूक विभागलेली असणेः निफ्टी-फिफ्टी हा आघाडीच्या 50 कंपन्यांचा इंडेक्स आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीला मदत करणाऱ्या 13 क्षेत्रांचा(3) समावेश आहे. फायनान्स, तंत्रज्ञान, खनिज तेल आणि वायू, पायाभूत सुविधा, ग्राहक उपयोगी वस्तू अशा सर्वच क्षेत्रांमध्ये तुमचे पैसे आपोआपच विभागून गुंतवले जातात. यामुळे  लॉन्ग टर्म मध्ये आपला फायदाच होतो.

>> कमी खर्चातील गुंतवणूकः इंडेक्स फंडात फंड मॅनेजरला कोणते शेअर निवडायचे? एखाद्या शेअर मध्ये किती टक्के गुंतवणूक करायची? असा निर्णय घ्यायचा नसल्यामुळे पोर्टफोलिओ तयार करणे सोपे पडते, यामुळे एक्सपेन्स रेशिओ कायमच कमी असतो.

>> पोर्टफोलिओ रिबॅलेंसिंगः इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक इंडेक्समधील शेअर्सच्या प्रमाणांमध्येच केलेली असल्यामुळे ज्यावेळी मार्केट बदलेल आणि इंडेक्समधील एखादा शेअर बदलेल तेव्हा आपोआपच तुमच्या पोर्टफोलिओ मधील तो शेअर जाऊन त्या जागी दुसरा शेअर येतो. यामुळे जसा इंडेक्स वर जाईल तसा आपोआपच तुमचा पोर्टफोलिओ सुद्धा वर जाणार असतो.

>> नाविन्यपूर्ण इंडेक्स फंड योजनाः गेल्या काही वर्षात फंड कंपन्यांनी इक्वल वेट इंडेक्स फंड, फॅक्टर बेस्ड फंड, सेक्टर फंड अशा विविध प्रकारच्या इंडेक्स फंडाची श्रेणी बाजारात आणली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना चांगला पर्याय निर्माण झाला आहे.

>> गुंतवणुकीतील पारदर्शकताः एखाद्या फंड मॅनेजरच्या निर्णयावर आपला अख्खा पोर्टफोलिओ अवलंबून असणे हे धोकादायक वाटते, जर फंड मॅनेजरचा निर्णय चुकला तर त्याचा थेट फटका म्युच्युअल फंडाच्या योजनेला बसतो. याउलट इंडेक्स फंडात संपूर्ण पारदर्शकता राखली जाते. जसे इंडेक्स मध्ये शेअर्स असतात अगदी त्याच प्रमाणात गुंतवणूक करायची असल्यामुळे आपल्याला कायमच ही खात्री असते की आपण समजा निफ्टी 50 या इंडेक्स फंडात गुंतवणूक केली असेल तर आपले पैसे त्याच पन्नास शेअर्स मध्ये त्याच प्रमाणात गुंतवले जाणार आहेत. 

>> लॉन्ग टर्म मध्ये लाभदायकः गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ इंडेक्स फंडांनी आपले दर्जेदार रिटर्न्स गुंतवणूकदारांना दाखवले आहेत. उदाहरणार्थ एस अँड पी बी एस ई मिडकॅप इंडेक्स भारतातील सगळ्या मिडकॅप कंपन्यांचा मिळून बनलेला इंडेक्स आहे. 16 फेब्रुवारी 2024 च्या आकडेवारीनुसार या इंडेक्सने मागील दहा वर्षात अंदाजे 20.26%(4) एवढा सरासरी फायदा गुंतवणूकदारांना करून दिला आहे. यावरून इंडेक्स फंड लॉंग टर्म मध्ये फायदेशीर ठरतात हे दिसून येते.

थोडक्यात आपल्या पोर्टफोलिओ मध्ये इंडेक्स फंड असणे लॉन्ग टर्म मध्ये भरपूर संपत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. भारतीय अर्थव्यवस्था प्रगतीच्या एका नव्या पर्वाकडे वाटचाल करत असताना या बदलाचा आपल्याला फायदा व्हावा या दृष्टीने इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इंडेक्स फंड हा उत्तम परतावा देणारा पर्याय आहे. विविध प्रकारच्या शेअर्समध्ये कमी खर्चात गुंतवणूक करून देणारा इंडेक्स फंड हा गुंतवणूकदारांचा हक्काचा साथीदार आहे. 

म्युच्यअल फंड विशेषतः इंडेक्स फंड इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे त्यातील जोखीम विषय सर्व माहिती वाचून समजून घेऊन तुमच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊन तुमच्या भविष्यातील गरजा कशा आहेत त्यानुसार इंडेक्स फंडात गुंतवणूक करायला पाहिजे.

1.IMF, World Economic Outlook2. https://www.spglobal.com/marketintelligence/en/mi/research-analysis/india-seizes-crown-of-fastest-growing-g20-economy- 3. https://www.nseindia.com/products-services/indices-nifty50-index 4. https://www.asiaindex.co.in/indices/equity/sp-bse-midcap   

ॲक्सिस म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक  साक्षरता मोहीम म्हणून प्रसिद्ध.ॲक्सिस म्युच्युअल फंड इंडियन ट्रस्ट अॅक्ट 1882 या कायद्याअंतर्गत स्थापन झालेली ट्रस्टी कंपनी आहे.ॲक्सिस बँक हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत.विश्वस्त - ॲक्सिस म्युच्युअल फंड ट्रस्टी लिमिटेड.गुंतवणूक व्यवस्थापक - ॲक्सिस असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड.जोखीम विषयक माहिती - ॲक्सिस बँक लिमिटेड या कंपनीचा फंड योजनेच्या परताव्याशी व त्यामुळेउद्भवणाऱ्या जोखमेशी कोणताही संबंध नाही.म्युच्युअल फंड गुंतवणुकी बाजार जोखीमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्याआधी सर्व योजना विषयक दस्ताऐवज काळजीपूर्वक वाचावेत.