पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने उत्तर दिले. पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार केला जात आहे. गुरुवारी हा संघर्ष वाढला. त्यामुळे युद्ध होतंय की, काय अशा चर्चा सुरू झाल्या. पण, यात अफवांचा बाजारही जोरात सुरू झाला. एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की, पुढील २ ते ३ दिवस एटीएम बंद राहणार आहेत. त्यावर सरकारने खुलासा केला असून, असं काही होणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुढील दोन ते तीन दिवस एटीएम सेवा बंद राहणार असल्याचा जो मेसेज WhatsApp फिरतोय, तो खोटा असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या प्रेस अँड इन्फर्मेशन ब्युरोने याबद्दल माहिती दिली आहे.
वाचा >>भारतीय सेनेचा'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
केंद्राने असा कोणताही आदेश काढला नाही
पीआयबीने स्पष्ट केले आहे की, एटीएम सेवा बंद ठेवण्यासंदर्भात भारत सरकारने कोणताही आदेश दिलेला नाही. भारतातील सर्व एटीएम नियमितपणे सुरू राहतील. त्याचबरोबर अशा प्रकारच्या फेक मेसेजपासून नागरिकांनी सावध राहावं, असे आवाहनही केले आहे.
WhatsApp वरील तो मेसेज काय?
भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यानंतर WhatsApp वर एक मेसेज व्हायरल होत आहे. यात असा दावा केला गेला आहे की, भारत पाकिस्तान युद्धामुळे सायबर अटॅक केल्यामुळे कदाचित एटीएम २ ते ३ दिवस बंद राहतील.
पाकिस्तान आणि भारत यांच्यातील लष्करी संघर्ष वाढल्यानंतर सोशल मीडियावर अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. पेट्रोल-डिझेलबद्दलही अशाच प्रकारचा मेसेज व्हायरल झाला होता. त्याबद्दल इंडियन ऑईलने सविस्तर खुलासा करत तो दावाही फेटाळून लावला आहे.