Join us  

गिफ्ट घेणं तर ठीक, पण देण्यावरही वाढतं टॅक्सचं टेन्शन; पाहा केव्हा भरावा लागतो कर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 3:26 PM

भेटवस्तू घेतल्यावर त्यावर कर भरावा लागतो, परंतु भेटवस्तू देण्यावरही कर आकारला जातो. पण तो कधी हे जाणून घेऊ...

Gift Tax Rule: दिवाळीत भेटवस्तूंची देवाणघेवाण तर खूप झाली असेल. त्यानंतर भाऊबीजही आली. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गिफ्ट्सची देवाणघेवाण होते. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्हाला भेटवस्तूंवरही कर भरावा लागतो? कदाचित तुम्हाला ही बाब माहितही असेल. भारतात गिफ्ट टॅक्स आकारला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही एखाद्याला भेटवस्तू देता तेव्हाही तुमच्यावर कर दायित्व लागू होते. म्हणजेच, भेटवस्तू घेतल्यावर त्यावर कर भरावा लागतो, परंतु भेटवस्तू देण्यावरही कर आकारला जातो. पण कोणत्या परिस्थितीत हा कर आकारला जातो समजून घेऊ.कधी द्यावा लागतो टॅक्स?जेव्हा तुम्ही भेटवस्तूंबद्दल बोलतो तेव्हा हे आवश्यक नाही की आपण कोणत्याही लहान भेटवस्तू, रोख रक्कम किंवा तत्सम कोणत्याही गोष्टीबद्दल बोलू. भेटवस्तूचा अर्थ एखाद्याला आर्थिक किंवा मालमत्ता हस्तांतरण देखील असू शकतो. अशा परिस्थितीत करा संदर्भातील नियम जाणून घेणं तुमच्यासाठी विशेषतः महत्वाचं आहे.

भाडं कोणाला देत असाल तर?उदाहरणार्थ, तुम्ही तुमचं एक घर भाड्यानं दिलं आहे आणि त्यातून मिळणारं भाडं थेट तुमच्या नातेवाईकांपैकी एकाला जाते. तुम्ही त्याकडे नातेवाईकाला दिलेली भेट म्हणून पाहू शकता, परंतु तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल, कारण कर नियमांनुसार, ते भाडे उत्पन्न आहे. ते प्रथम तुमचं उत्पन्न मानलं जाईल आणि नंतर ते भेट म्हणून पाहिलं जाईल, या प्रकरणात ते तुमच्यावरील कर म्हणून पाहिलं जाईल.

पालकांवर मुलांच्यावतीनं कर दायित्वयाशिवाय, अशी परिस्थिती उद्भवू शकते की पालकांनी त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या नावावर बँक खातं उघडलं आहे आणि त्यात पैसे जमा करत आहेत. जर असं असेल तर ते मुलासाठी भेट आणि पालकांच्या उत्पन्नातून ती रक्कम जात आहे. परंतु त्या बँक खात्यात जमा केलेल्या पैशावर मिळणारं व्याज देखील पालकांच्या उत्पन्नात जोडलं जाईल आणि त्यावर कर लागेल.

टॅग्स :इन्कम टॅक्सव्यवसाय