Join us  

Cryptocurrency मध्ये पैसै गुंतवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, सरकारकडून मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 1:23 PM

सरकार काही व्हर्च्युअल डिजिटल असेट्स सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या युआरएल ब्लॉक करण्याच्या तयारीत आहे. पाहा यात कोणाचा समावेश आहे.

Crypto News: अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिटनं मनी लाँडरिंग विरोधी कायद्याचं पालन न केल्याबद्दल नऊ परदेशी चालवल्या जाणार्‍या क्रिप्टोकरन्सी आणि ऑनलाइन डिजिटल मालमत्ता प्लॅटफॉर्म्सना नोटीस बजावली आहे. बिनेन्स (Binance) आणि कुकॉईन (KuCoin) सारख्या प्लॅटफॉर्म्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीये.

यांच्या युआरएल होणार ब्लॉकफायनान्शियल इंटेलिजन्स युनिटनं भारतातील मनी लॉन्ड्रिंग विरोधी कायद्याच्या तरतुदींचं पालन न करता बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या नऊ संस्थांच्या युआरएल ब्लॉक करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र देखील लिहिले आहे. बिनेन्स आणि कुकॉईन व्यतिरिक्त, हुओबी, क्रॅकेन, गेट डॉट आयओ, बिट्ट्रेक्स, बिटस्टॅम्प, एमईएक्ससी ग्लोबल आणि बिटफेनेक्स या व्हर्च्युअल डिजिटल असेट्स सर्व्हिस प्रोव्हायडर्सचा यात समावेश आहे.वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार व्हर्च्युअल डिजिटल प्रोव्हायडरवर रिपोर्टिंग, रेकॉर्ड ठेवणं आणि अन्य जबाबदाऱ्या आहेत, यात एफआययू आयएनडीसोबत रजिस्ट्रेशनचाही समावेश आहे. मार्चमध्ये, सरकारने व्हर्च्युअल डिजिटल असेट प्रोव्हायडर्सना पीएमएलए तरतुदींच्या कक्षेत आणलं होतं. आतापर्यंत, ३१ व्हर्च्युअल डिजिटल असेट्स प्रोव्हायडर्सनं फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटमध्ये नोंदणी केली आहे.गुंतवणूकदारांची संख्या १.९ कोटींवरदेशात एकूण क्रिप्टो गुंतवणूकदारांची संख्या १.९ कोटींहून अधिक आहे आणि त्यापैकी सुमारे नऊ टक्के महिला गुंतवणूकदार आहेत. Coinswitch च्या रिपोर्टनुसार, देशातील क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणारे ७५ टक्के तरुण वर्ग आहे आणि त्यांचं वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान आहे. क्रिप्टो गुंतवणुकीच्या एकूण मूल्यापैकी फक्त दिल्ली, बंगळुरू आणि मुंबई या महानगरांमध्ये एक पंचमांश वाटा आहे. मूल्यानुसार क्रिप्टोमधील गुंतवणुकीच्या बाबतीत दिल्ली देशात पहिल्या स्थानी आहे.

टॅग्स :क्रिप्टोकरन्सीव्यवसाय