Join us  

WiFi असलेलं डेबिट कार्ड वापरताय? वेळीच व्हा सावध, जास्त काळजी घेण्याची आहे गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 8:38 AM

तुम्ही कॉन्टॅक्टलेस, वाय-फाय सक्षम डेबिट कार्ड वापरत असाल तर जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

तुम्ही कॉन्टॅक्टलेस, वाय-फाय सक्षम डेबिट कार्ड वापरत असाल तर जास्त काळजी घेण्याची गरज आहे. असे कार्ड वापरताना ओटीपी किंवा पिनची गरज पडत नाही. त्यामुळे जर भामट्यांनी तुमच्या कार्डजवळ एखादे पीओएस मशिन आणले तरी खात्यातून पैसे कापले जाऊ शकतात. 

असे सुरक्षित राहा

  • कॉन्टॅक्टलेस कार्डसह पाकिटात धातूचा तुकडा अडथळ्यासाठी ठेवा.
  • कॉन्टॅक्टलेस कार्डसाठी मेटल कव्हरचा वापर करा.
  • आरएफआयडी ब्लॉक करणारे पाकीट वापरू शकता. 
  • पेमेंट करताना कॉन्टॅक्टलेस कार्ड स्वतः पीओएसजवळ न्या.
  • कार्ड कोणत्याही विक्रेत्याच्या हातात देऊ नका.
  • वेळोवेळी तुमचे स्टेटमेंट तपासा.
  • बँकेशी संपर्क साधा आणि तुमच्या संपर्करहित कार्डची पेमेंट मर्यादा सेट करा. 

कॉन्टॅक्टलेस कार्ड एनएफसी (नियर फील्ड कम्युनिकेशन) आणि आरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) वर कार्य करतात. त्यामध्ये एक चिप असते, जी पातळ धातूच्या अँटेनाला जोडलेली असते. त्याची रेंज ४-५ सें.मी. असते. अशात जर कार्ड पीओएस मशिनच्या संपर्कात आणले तर खात्यातून पैसे कापले जाऊ शकतात. त्यामुळे कॉन्टॅक्टलेस कार्डचा वापर योग्यपणे करा.

टॅग्स :बँकधोकेबाजी